अभंग

पन्नाशीत लिहिलेले अभंग सप्टेंबर १९५८

उजाडले आज, काही तरी चित्तीं।

अमोल संपत्ति, प्राप्त झाली ॥

तेजांची भांडारे, खुली झाली सर्व।

पावलें हे पर्व, आनंदाचें ॥

संपले देहाचे, दास्य ते दीनवाणें।

कुणाचे न देणें, उरे आतां ॥१॥

 

आळवावा देह, खेळवावें मन।

हेंच तत्त्वज्ञान, जगा ऐका ॥

रुचीला नेत्राला, त्वचेला कर्णाला।

कधीही न झाला, पुरा तोष ॥२॥

 

एखादे वेड जें, वाढवावे चित्तीं।

तयानेच शांती, मिळे जगी ॥

अनंतते, मला, तुझे लागे खूळ ।

शरीर देऊळ, तुझे झालें ॥३॥ (चित्त)

 

विचाराचे पाय, ठेंचाळती सदा।

चित्ताच्या आपदां, कशा वारू ॥

सत्याचे तेज जें, दूर कोठे झळके ।

कधी तें ठाउकें, मला होई ॥

हीच चिंता जीवा, सारखी लागुनी ।

शांति ना जीवनीं, मुळी वाटे ॥४॥

 

५-९-५८

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search