प्रस्तावना

गुरुमाऊली स्वत: अनंत यातना सोसून आपल्या प्रियोत्तम शिष्याचे संरक्षणच करते

-७-

साधकाचा हा भ्रम इतका नैसर्गिक, रोचक व समाधानदायक असतो की सिद्ध सद्गुरुंच्या मातृनिर्विशेष प्रेमवृत्तीला त्या भ्रमाच्या बुदबुदाचे विर्सजन करणे अतीव दु:खद होते.

ज्वालाग्राही, स्फोटक द्रव्ये खच्चून भरलेला एखादा कंदुक आपल्या लाडक्या लहानग्याचे हातामध्ये असावा, त्या कंदुकाशी खेळत बसण्याचा अजाण प्राण्रघातक बालहट्ट त्याने घेतलेला असावा; जरा तो कंदुक दूर सरकला तर सरकेल की काय या कल्पनेने सुद्धा - एक द्रावक किंकाळी त्या कमलकोमल कंठांतून निघण्यासाठी सिद्ध असावी - अशा प्रसंगी आपल्या पंचप्राणांची सावधानता एकवटून त्या अल्लड अर्भकाची माऊली आपल्या चिमु्कल्या चांदाचे लाड काही क्षण - काही मोजके क्षणच - पण चालूही देते. अगदी हेच चित्र श्री गुरुमार्गांत आढळून येते.

गुरुमाऊली आपल्या प्रियोत्तम शिष्याला अहंकाराच्या विदारक पकडीत तो असतानासुद्धा त्याला अणुमात्र न दुखावता, स्वत: अनंत यातना सोसून त्याचे लाड-कोड पुरवीत पुरवीत पुन:त्याचे संरक्षणच करते. ही प्रक्रिया इतकी नाजूक, इतकी कला-कुसरीची असते, इतका अंत:संयम या भूमिकेला आवश्यक असतो की, संपद्रायविशिष्ट श्री गुरुनांच तो शक्य होतो.

श्री गुरु माऊलीच्या स्नेहार्द्र कूर्मदृष्टीने नकळत पुष्ट होता होता या व असल्या अनेक महान दिव्यांतून साधक अखेरचा विजय मिळवू शकतोच आणि मग त्याला गुरुशिष्य-संबंधांतली आंतर रहस्ये उलगडू लागतात.

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search