You are here / रोगमुक्तीसाठी महर्षींचे मार्गदर्शन

रोगमुक्तीसाठी महर्षींचे मार्गदर्शनउपन्यास

आपल्या आर्यवैद्यकाचे दिव्य व भव्य स्वरूप अवगत नसल्यामुळे आज त्याचा आपण ‘उद्धार’ केला पाहिजे अशी भूमिका स्वीकारली जाते.
या क्षणापर्यंत आयुर्वेदाची राजतरंगिणी अव्याहतपणे स्वत:च्या चिरंतन शक्तीने समृद्ध होत राहिली आहे.
एखाद्या कालखंडात काही मानवांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले तरी ती केव्हाही नष्ट होणार नाही.
आयुर्वेदश्रुति ही एक स्वयंप्रभ ज्योति आहे. तिचे अन्तसत्य अत्यंत प्रभविष्णु आहे. कालाची कराल दष्ट्रा आयुर्वेदविद्येला केव्हाही स्पर्श करू शकणार नाही.

वैद्य शंकरराव गोविंदराव माने यांचा व माझा परिचय अगदी अलीकडे झाला. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथशतकाची भव्य सत्यकथा मी दोन महिन्यांपूर्वी ऐकली.
अल्पशिक्षित पण अत्यंत सुसंस्कृत अशा या व्यक्तीची तत्त्वनिष्ठा मला आदरणीय वाटली.
त्यांनी वयाच्या १९ व्या वर्षी सद्गुरू श्री.ह.पां.कोटणीस महाराज सांगली यांचा अनुग्रह घेऊन ज्ञानयोगाला प्रारंभ केला. नंतर १५ वर्षे साधना; हजारो ग्रंथांचे अहोरात्र वाचन व मनन करून त्या ग्रंथांतून दक्षतापूर्वक, क्षणश: व कणश: ज्ञान-रेणु टिपून आता त्यांनी एक मोठा रांजण भरून ठेविला आहे.
या रांजणांतील ज्ञानधनाचा महाराष्ट्राने व भारताने यथेष्ट उपयोग करावा अशी त्यांची निवेदना आहे.

आहारशुद्धौ सत्वशुद्धी:। हे भगवान सनत्कुमारांचे सूत्र, आत्मशोधनप्रक्रियेचा अधिष्ठानभूत सिद्धांत आहे. सत्त्व-शुद्धी म्हणजे आत्म-शुद्धी.

आत्मशुद्धी करावयाची तर प्रथम आहाराची शुद्धी करावयास हवी.

आत्मशुद्धी म्हणजे शरीर-शुद्धी, अंत:करण-शुद्धी व परिणामत: जीवात्म-तत्त्वाची शुद्धी होय.

शुद्धी म्हणजे काय? `नैर्मल्यसम्पादनम्' ही धर्मशास्त्रांतली व्याख्या प्रसिद्धच आहे.

शुद्धी शब्दांचा न्यायदर्शनांतला अर्थ तदितरधर्म अनाक्रांतत्वम्। असा आहे.

Peace is a positive process.
Its inner import is infinitely richer than mere war-less-ness
Just as we have been waging wars since the dawn of history now we must learn to wage peace.
Splengler, after the First World War, and Toynbee, after the second, have convincingly shown us through their monumental study of world cultures that western civilization has become increasingly decadent and has neared its complete collapse.

[महर्षि न्या. डॉ. विनोद यांची बीजाक्षर मीमांसा, पश्यंती (२८)]
------------

मंत्र शास्त्र हे मनावर अधिष्ठित आहे. आणि मनाच्या आधीन इंद्रीये आहेत. म्हणून इंद्रीयांवर होणाऱ्या ''सुखदु:खयो`` हे गीतेतील प्रतिपादन या दृष्टीने उद्बोधक आहे.

मंत्र - मन आणि व्याधी यांचा अशा त‍ह्रेचे सामर्थ्य आहे. त्या मंत्राचेही विविध प्रकार आहेत. वेद मंत्रापासून तो जारण मारण विद्येतील प्राकृत आणि दुर्बोध शब्दरचनेच्या शाबरी मंत्रांपर्यंत अनेक प्रकार प्रचलित आहेत.

[शान्ति-सम्राट, महर्षि विनोद यांचे मूलगामी विचार. पश्यन्ती (६)]
------
आयुर्वेद म्हणजे शरीरांतला साम्य-वाद आहे. असे मला वाटते. शरीरांतल्या जीवपेशी, सप्तधातू व उपधातू, एकादश इन्दिये व आत्मा, यांच्या गती, स्थिती व कृती या सर्वांमध्ये विधायक सह-योग निर्माण करणे, हे आयुर्वेदाचे उद्दिष्ट आहे.

शरीरांतल्या अनंत जीवपेशी व इतर सर्व घटक मिळून एक समाज आहे. एक समष्टि संस्था आहे. त्या घटकांमध्ये सहयोग व शान्ति असणे याचे नाव स्वस्थता किंवा स्वास्थ्य.

Facebook page

We have a page on facebook "Maharshi Vinod Publications.
You can join us.

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml