You are hereDeep Meditative state • Maharshi Vinod • Mystic • महर्षी विनोद • उन्मनी अवस्था

Deep Meditative state • Maharshi Vinod • Mystic • महर्षी विनोद • उन्मनी अवस्था


कुंडलिनी जागृती - नाथप्रसाद - इ-बुक

१९८३ सालानंतर शांतिमंदिरमध्ये जुनी कागदपत्रे यांचा शोध घेत असताना एका लाकडी पेटीमध्ये काही जुने बिन आखलेले कागद मला सापडले. या कागदांवर पेन्सिलने लिहिलेले, वळणदार, सुस्पष्ट, सुंदर अक्षरांतील हजारो श्लोक मला दिसले. त्यात १९३८,३९,४०,४२,४५ या काळात महर्षि विनोद सरदार मेहेंदळयांना श्लोक सांगताना आलेल्या उत्कट अनुभवाचा संदर्भ मला सापडला. काही विशिष्ट दिवशी, विशिष्ट वेळी, पुण्यातील सरदार मेहेंदळेंच्या घरी महर्षि विनोद जात असत आणि अतीन्द्रिय अवस्थेमध्ये स्फुरलेल्या काव्यपंक्ती टिपून घ्यायला ते रावसाहेब मेहेंदळेंना सांगत असत. त्याचे विलक्षण वर्णन श्रीज्ञाननाथजी रानडेंनी कथन केले आहे. ते श्लोक वाचून मी खूप भारावून गेले होते.

श्लोक ३१ ते ४०

मानवतेच्या मुखीं रोंगण घनदाट।
चित्तीं ओळंबले तिमिर मेघ विराट।
भिनला विखार सूक्ष्मदेही कांठोकाठ।
नाट्य गुणें जीववीन तया ।। ।।३१।।

ओळखलें माझें इंगित।
उकलिलें माझे नाट्यतंत्र।
व्यक्तविलें माझें गुह्यचरित्र।

श्लोक २१ ते ३०

अंतर्मुखवितां चक्षुतेज।
ब्रह्मरसवितां पौरूष ओज।
सुशब्दवितां श्रीरत्नगुज।
प्रसन्नली श्री ललिता ।। ।।२१।।

व्योमबीजें लतावली।
वेलतत्त्वें कथावली।
सनातन ऋतें पंथावली।
श्रीसंहितेंत या! ।। ।।२२।।

श्लोक ११ ते २०

षट् चक्रांचे षड्दर्शन।
सहस्त्रारीं एकवटलें अभिन्न।
कोटिस्वरांचें सामनादन।
मुरलींत या! ।। ।।११।।

महाशक्तीचें नि:शब्द ज्ञापन।
महाभक्तीचे निर्भाव ख्यापन।
लोकेश्वर यज्ञाचें उद्यापन।

श्लोक १ ते १०

नीड अश्वत्थ शाखेंतलें।
मेघादृशा सुस्पष्ट अवलोकिलें।
प्रकाश रश्मींत गुंफले।
देहजाल त्याचे ।। ।।१।।

तया अश्वत्थाचें शिरीं।
विराजे दीपमाला परावैखरी।
ते दीप स्नेहाळले सामस्वरी।
जय जय! स्वरसरस्वती! ।।२।।

साष्टांग देहाची अष्टमी माला।
तुरीय यौवनाची किशोरी बाला।
श्रीमन् - महालक्ष्मी श्यामला।
बुला व बली येथे ।। ।।३।।

स्वाराज्य मंडपलें अनुभूतींत।
साक्षित्त्व सांठलें अनुवृत्तींत।
पीठस्थले जीव अनुग्रहीत।
घबाड मुहूर्त हा! ।। ।।४।।

येथ भविष्य भूतला।
येथ सौषुप्त् जागरला।
येथ आत्मदेव मृत्तिकला।
लक्ष्मी संपुटीं ।। ।।५।।

दैनंदिन संवर्त आकारले।

१ ऑक्टोबर

१ ऑक्टोबर:
एकूण श्लोक: ५०

ऑक्टोबर

ऑक्टोबर:

१९३८, ऑक्टोबर, दि. १, २, ३, ६, ७, ८, १०, ११, १२, १३, १४, १५, १६, २०, २२
एकूण श्लोक: ५०४
दि. १: ५० श्लोक
दि. २: ७५ श्लोक
दि. ३: ३० श्लोक
दि. ६: ३३ श्लोक
दि. ७: ४५ श्लोक
दि. ८: २२ श्लोक
दि. १०: २९ श्लोक
दि. ११: २८ श्लोक
दि. १२: २७ श्लोक
दि. १३: २७ श्लोक

श्लोक १०१ ते ११२

साक्षात् पाऊलपीठ स्पर्शिलें।
मी मम जाड्यदेह विमर्शिले।
‘ब्राह्मण’बीज महत्कृपया प्रदर्शिलें।
जय! अलख्! जय! ललिते! ।। ।।१०१।।

प्राज्ञिलेली देहोsहं वृत्ती।
आच्छादिलेली सोsहं भगवती।
आज्ञिलेली ‘कुशला’ वृत्ती।

श्लोक ९१ ते १००

हेत माझा सफळेल।
नृत्त्य माझें प्रफुल्लेल।
मंत्रदेह माझा हिरण्मयेल।
नि:शंक मी, तुम्हीहि व्हा! ।। ।।९१।।

आर्तलेले करूणजीव।
धन्यतील तुम्हां व्यक्तवितां श्रीविद्यास्वभाव।
जेथ कोटिजीवविश्व सापडे ठाव।

२८ सप्टेंबर

२८ सप्टेंबर:
एकूण ११२ श्लोक

Facebook page

We have a page on facebook "Maharshi Vinod Publications.
You can join us.

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml