You are here / वेद व वैदिकांविषयी महर्षिंचे लेखन

वेद व वैदिकांविषयी महर्षिंचे लेखन


पुस्तकाचे नाव: ऋग्वेद दर्शन
लेखक: रा. गो. कोलंगडे.
प्रस्तावना: डॉ. धुंडिराज विनोद.

स्वस्तिवाचन:
    वैदिक संस्कृतीचे व्युप्तन्न विवेचक श्री.रा.गो.कोलंगडे यांच्या ‘ऋग्वेददर्शन’ या अभिनव ग्रंथाचे स्वस्तिवाचन करताना मला आज विशेष समाधान होत आहे. या ग्रंथांत ऋग्वेदाचे अंतरंग विशद करून श्री.कोलंगडे यांना मानवी समाजाच्या व संस्कृतीच्या अतीत, अनागत व वर्तमानकालांचे एक स्थायी चित्र रेखाटले आहे.

गायत्री मंत्र हा अखिल वैदिक संस्कृतीचे एक स्वयंप्रकाश व स्वयंपूर्ण प्रतीक आहे.

गायत्री मंत्राची दीक्षा ही सर्व-पाप विमोचन आहे.

गायत्री मंत्राने व्यक्तीचे व समाजाचे `मेधा-जनन' होते. गायत्री मंत्राने इच्छा शक्ती प्रबल व प्रखर होते. व्यसनाच्या पाशातून गायत्री जपाने मुक्तता झाल्याची अनेक उदाहरणे माझ्या अनुभवांत आहेत.

गायत्री मंत्राने इष्ट फलप्राप्ती होते.

कोठल्याही मानवामध्ये ऊर्जस्वल ब्रह्मतेज, प्रभावी प्रज्ञा व ऐहिक ऐश्वर्य गायत्री मंत्राच्या जपाने नि:संशय उदीप्त होईल.

दीपावली अंक - १९६७ (२१)

- १ -
ज्ञानदूताचा हा आठवा अंक आठवा अवतार!
श्रीकृष्ण हा ईश्वराचा आठवा अवतार आहे.
हा ज्ञानाचा दूत आहे. ज्ञानाने याला पाठविलेले आहे. ज्ञानाची विविध अंगे व प्रकार हा घेऊन येतो; त्यांची वैशिष्ट्ये प्रकट करतो विशद करतो.
दुसरा अर्थ ज्ञान हाच अेक दूत आहे. अतीन्द्रिय सत्तेच्या किंवा सत्याचा हा संदेशवाहक आहे.
गेली आठ वर्षे प्रत्येक दीपावलीला ही एक पणती लागते. खरोखर ती कोण लावतो कोणास ठाऊक. तिला उजळणाऱ्या हातामागे अंनत हात असतील यात संशय नाही .

(जून - १९६४)

रोहिणी हे नाव आरोहणाचे, आक्रमणाचे प्रतीक आहे.

रोहिणीला आज सतरा वर्षे पूर्ण होऊन ती अठराव्या वर्षात पदार्पण करीत आहे.

श्रीमती निर्मलादेवींच्या कल्याणकारक राज हस्ताने रोहिणीच्या अठराव्या वर्षारंभ - अंकाचे प्रकाशन होत आहे ही गोष्ट रोहिणीच्या उज्वल भवितव्याचे एक बोलके `प्रसादचिन्ह' आहे. अठरा या संख्येतील दोन घटक अंकांची बेरीज नऊ होते. नऊ हा, संख्याशास्त्रांतील परमोच्य विकास बिंदू आहे. नऊ किंवा त्या आकड्याचे गुणाकार यांचेबद्दल गणित शास्त्रांत कित्येक चमत्कृति उपलब्ध आहेत.

अठराव्या वर्षी किशोर अवस्था संपून `स्त्री' `युवती' होते, स-ज्ञान होते. अधिकारिणी होते.

    ‘याज्ञवल्क्य’ हे भारतीय तत्त्वज्ञानाचे ‘पितृ-तीर्थ’ आहे.

‘अहं ब्रह्मास्मि’ या वैदिक महावाक्याचे द्रष्टे, शुक्ल युजर्वेदाचे व शतपथ ब्राह्मणाचे प्रणेते आणि यज्ञसंस्थेचे संशोधक याज्ञवल्क्य, यांच्या तत्त्व-स्थण्डिलावर भारतीय वैदिक संस्कृति सु-स्थिरलेली आहे.

    याज्ञवल्क्यांच्या तत्त्वशास्त्रातला मेरुमणि म्हणजे आत्मतत्व.

    आत्मतत्वाचे संशोधक म्हणूनच त्यांना भारतीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासात अग्रस्थान आहे. अर्थात त्यांच्यापूर्वी ऋग्वेदकालीन द्रष्ट्यांनीही आत्मतत्वाचा साक्षात्कार, उच्चार, विचार व प्रचार केला आहे. परंतु याज्ञवल्क्यांनी आत्मतत्त्वाला तत्त्वशास्त्रीय संदर्भात प्रतिष्ठित केले.

(१)

    भारतीय यज्ञसंस्थेचा रहस्यार्थ विशद करणार्‍या, ऐतरेय ब्राह्मणाचें यथासांग संशोधन, भारत भूमीतच होऊ शकेल असे प्रोफेसर मॅक्समु्ल्लर म्हणतात.

वैदिक यज्ञसंस्थेची अंगोपांगे इतकी जटिल आहेत की आर्य परंपरेत परिणत झालेल्या भारतीय अभ्यासकालाच त्यांचा योग्य उकल होईल. परकीय संस्कृतीत वाढलेल्या पंडितास यज्ञविधीतील मर्मस्थाने समजणे सर्वथैव अशक्य आहे.

    मातृभूमीच्या नि:सीम कृपेमुळे एका ऋषिपुत्राला लाभलेले यज्ञशास्त्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण होय.

पुस्तकाचे नाव: पुरूषसूक्त-प्रणीत समाज-शासन-शास्त्र
लेखक: डॉ. आ. कृ. भागवत
श्री जगद्गुरू न्यायरत्न डॉ. धुं. गो. विनोद यांचा आशीर्वाद

-२-

वेद हे ‘अन्-अंत’ आहेत. वेदांना स्थलत:, कालत:, स्वरूपत: व तत्त्वत: केव्हाही नाश संभवत नाही.

पृथ्वी सूर्याच्या समोर नसली म्हणजे रात्र होते, पण रात्र झाली म्हणून सूर्याचा नाश होऊ शकत नाही. सूर्यनारायणाप्रमाणेच भगवान वेदोनारायणाचे आहे. आपल्या दृष्टीच्या आड वेदोनारायण झाले असे वाटले तरी त्यांच्या दृष्टीच्या आड आपण कधीही होऊ शकत नाही.

Facebook page

We have a page on facebook "Maharshi Vinod Publications.
You can join us.

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml