पुस्तकाचे नाव: ज्ञानेश्वरी प्रवेशिका
लेखक: पं.महादेवशास्त्री जोशी
प्रस्तावना: डॉ. धुंडिराजशास्त्री विनोद
-१-
पं.महादेवशास्त्री जोशी यांचा ‘ज्ञानेश्वरी-प्रवेशिका’ हा ग्रंथ म्हणजे श्री ज्ञानेश्वरीच्या विभूत्मत्वाचे एक ओझरते दर्शन होय. ज्ञान-ईश्वराच्या आध्यात्मिक ‘ऐश्वर्या’चे महनीय तेजोगोल, लौकिक दृष्टीपथात आणणारा हा एक विनम्र अंगुलिनिर्देश आहे.