आवडीची वस्तु मिळाली की आनंद होतो.
आनंद हे प्रियत्वाचे प्रतीक आहे.
बृहदारण्यक उपनिषदात श्रीयाज्ञवल्क्य म्हणतात त्याप्रमाणे, प्रियत्व हे आत्मतत्त्वावर अधिष्ठित आहे.
आनंदाचा उद्भव आपलेपणात, आत्मीयतेत, अर्थात आत्मतत्त्वांत होतो.
आत्मतत्त्वाचा साक्षात्कार ‘योग’ जन्य आहे.
व्यक्तीच्या विविध अंगोपांगांमध्ये ‘योग’, संगीत, समन्वय निष्पन्न करणे हे मोक्षशास्त्राचे, अध्यात्माचे ध्येय हा समन्वय विशिष्ट प्रक्रियेने साधावयाचा असतो.
वैलक्षण्य, व्यतिरेक, वेगळीक हे त्या प्रक्रियेचे मर्म आहे.
विषय हे, विषयविषयीसंबंधाच्या भूमिकेला आत्मतत्त्वातून ‘विलक्षण’ म्हणजे निराळे आहेत; पण ‘आपुलीचे ठायी’ स्वरूपत:, विषय हे आत्मरूपच आहेत. विषयविषयीसंबंधाचा अतिरेक करून, त्या द्वंद्वसमासाला अधिष्ठानभूत असणारे आत्मतत्त्व एकत्वाने अनुभविणे म्हणजे समन्वय-सिद्धी. विषयनिष्ठ आनंद हा आत्मानंदाचा विपर्यस्त आविष्कार आहे.
मानुषी आनंद ब्रह्मानंदाचाच एक अंशावतार आहे. विषय व्यवहारातील ‘रस’, आनंद म्हणजे आत्मतत्त्व.
तैत्तिरीयउपनिषद् म्हणते ‘रसो वै स:’ अंशानंदाचा आपणास नेहमीच अनुभव असतो; पूर्णानंदाचा उपभोग अंशानंदाचा आपणास नेहमीच अनुभव असतो; पूर्णानंदाचा उपभोग सहजावस्थेच्या पुन: प्राप्तीनंतर.
पूर्णानंद ही आपली सहजावस्था आहे. अंशमात्र आनंदाचा शोध आपण स्वस्वरुपविस्मृतीमुळे करीत असतो.
सर्वानर्थहेतुरात्मानवबोध एव। सुखस्य चानागामापयिनोऽपरतन्त्रस्यात्मस्वभावत्वात्तस्थानवबोध: पिधानम्।। (सुरेश्वराचार्य : नैष्कर्म्यासिद्धी) किंवा श्री नारायणमहाराज जालवणकर म्हणतात त्याप्रमाणे “परिपूर्ण सहजानंद। अखंड आहे निर्द्वंद्व। आनंदाने किमर्थ शोध । आनंदाचा करावा।।”
‘आनंदसागरात’ अशा तर्हेने प्रतिबिंबित झालेली श्री नारायण महाराज यांची वाक्चंद्रिका जितकी आल्हादक तितकीच उद्बोधक, जितकी प्रासादिक तितकीच शास्त्रपूत आहे.
‘आनंदसागरात’ अवगाहन करणार्यास वेदान्ताची गूढ तत्त्वमौक्तिके सहज हस्तगत होतील. म्हणून, या सागरतीर्थी महाराष्ट्रीय जनतेने आपल्या चित्तदेहास नित्यस्नान घालावे अशी प्रार्थना करून हा ‘पुरस्कार’ संपवितो.
‘आत्मैवावन्द।’
--------------------------------
पुस्तकाचे नाव: श्रीनारायणमहाराज जालवणकरकृत आनंदसागर
लेखक: माधव गोविंद भिडे
प्रस्तावना: न्यायरत्न धुं.गो. विनोद, एम्.ए.पी.एच्.डी., दर्शनालंकार यांची तात्त्विक पार्श्वभूमी
-----------------------------
- धुं.गो.विनोद
जपज्ञ-भुवन, गोवर्धनदास संस्था,
खेतवाडी मेन रोड,
मुंबई नं. ४
ता. १५-७-१९३७
ॐ ॐ ॐ