२५ मार्च:
एकूण श्लोक: ४
संध्याकाळी ०८.२७
उसळले प्रलयाग्नीचे डोंब।
उन्मूळले मूलप्रकृतिचे कोंब।
प्रारंभली झंझावातांची झोंब।
विश्वकेंद्र स्थानभ्रष्टलें ।। ।।१।।
जीवाणूंचा उत्स्फूर्तला कोलाहल।
अचानक उरफाटला खगोल।
सुटला स्थितिगतिशक्तींचा तोल।
व्युत्क्रमली सहजावस्था ।। ।।२।।
संध्याकाळी ०८.४९
मृत्यूची मूर्ती दंष्ट्राकराल।
सजीवली बृहद्देहली जगडव्याळ।
रसातळीं वोपिलें श्याम अभाळ।
चौभंगला अश्वत्थ ।। ।।३।।
अध:शाखांचा महाविस्तार।
तेथ स्वरूपलें सुवर्ण महाद्वार।
निवृत्त निरस्थेचा निरालंब प्राकार।
वृत्यवस्थेंत कळसला! ।।४।।