एकूण श्लोक:९
संध्याकाळी ०६.२०
नवपुष्पांत एक दृति।
नवदेहभावांत एक ज्ञिप्त्।
नव समीरांत एका गति।
श्री नवविद्या ही ।। ।।१।।
संध्याकाळी ०६.४२
श्री प्राण माध्वी आणि शाबरी।
ललिता उद्गीथा दिगंबरी।
अवधूतां वारूणीं वैश्वानरी ।
नवविद्या नवकोश भ्रमरी ।। ।।२।।
द्युलोक बाष्पलोक भूलोक ।
बीजलोक आणि पंचम क्षेत्र लोक।
पंचाग्नि स्फुल्लिंगाचा उन्मेख ।
पंचलोकीं प्रस्फुरे ।। ।।३।।
संस्पर्श बिंदू हे चिद्विकासाचे ।
पंच पाद कीं महान्यायाचे।
पंच कोश वा समष्टि तत्त्वाचे ।
पंचामृत पंचरसले ।। ।।४।।
व्यष्टितत्त्वांतील पंचरेणू ।
नाभि हृदय कूर्म प्रकाश स्थाणू।
जो दीपे आज्ञा स्थंडिलिं सानू ।
आणि पंचम मूर्ध्नि बीजांत मध्यान्हभानू ।
स्वयं आविर्भवे! ।। ।।५।।
संवित्तीच्या महाज्वालेंत सुवर्णलेले।
प्रतीकक्षीर पंचबिंदुगर्भीं प्रक्षेपिलें।
जीवचितिचे पंचामृतस्नान विधानले।
गुह्योत्तम विधिकौस्तुभ हा! ।। ।।६।।
समष्टि तत्त्वाच्या पंचगर्भ कोशीं।
निक्षेपिलें अमृतबीज नील अवकाशीं।
पंच महाशब्दांच्या अक्षरवेशीं ।
अक्षरीचा क्षीर निक्षेप हा ।। ।।७।। संध्याकाळी ०८.१५
‘यं’ ‘रं’ ‘वं’ ‘हं’ ‘क्लीं’ इति पंचाक्षरें ।
लेउनि जणु हीं पंच अलंकारें।
समष्टि तत्त्व विराजें जें सुस्नातलें क्षीरे ।
महासंविदो दधीच्या ।। ।।८।।
स्वस्तिश्रिये! महालक्ष्मि! संवित्तनये! ।
श्री नवविद्यांच्या सनातन जननिये।।
स्वस्ति! नवविध भावनांच्या शरणिये ।।
नवोद्गार संहिते नव नमोsस्तु ते! ।। ।।९।।