४ जानेवारी:
एकूण श्लोक: ४
संध्याकाळी ०८.५३
निष्पत्ति निषिद्धि नियुक्ति।
नियति निवृति निर्ऋति।
निर्वृत्ति निवृत्ति निर्व्यूढि।
नवोल्लास हे विनियोग विद्येचे! ।। ।।१।।
प्रथमत्रय तर्कशास्त्रगत।
द्वितीय मनोविज्ञानांतर्गत।
तृतीय सत्ताशास्त्र संस्थित।
त्रैविद्या या एकंकारल्या ।। ।।२।।
रात्रौ ०९.१८
विनियोग म्हणजे भावसंव्यवस्थिति।
पूर्ण-स्वांची प्रफुल्ला परिणति।
संवित् - संकर्माची संयुक्त द्युति।
पौर्णिमा क्षीरज्योत्स्नेची ।। ।।३।।
चतु:श्रृंगीचें हें द्वितीयश्रृंग।
धवलगिरी हा अनुत्तमोत्तुंग।
दुग्धोदधि हा सर्वथैव अथांग।
मत्स्यमौक्तिकांचें मूलागार ।। ।।४।।
रात्रौ ०९.२८२ जुलै:
एकूण श्लोक: ०९
दुपारी ०२.०५
स्वस्ति! स्वस्ति!नरनारायणशरण्ये!
स्वस्ति! वैराजश्रिये वसुवरेण्ये
वियदविलासिनि वंद्ये वदान्ये
स्वस्ति! अलखे!! ॥१॥
दुपारी ०२.४७
मरकतांचे मणिपीठसंस्थापिले
ज्वलज्जीवनांत महदादेश आलेखले
अलक्ष्यगायत्रीनें मानव्य आज्ञापिलें
व्यासकुटिरकौतुक हें ॥२॥ दुपारी ०३.००
निष्कायांत निर्झरलेल्या स्फूर्ती
द्रष्टारांनी डोळविलेल्या श्रुती
तुरीयेत निरवस्थलेल्या अवधूतचिती
अलक्ष्यभानात अनुभवाव्या! ॥३॥
अलख-नंदेचा अखंडधाराप्रपात
शून्यसंवित्तीचा सहस्रालेला माध्यान्हझोत
सामछंदांचें समाधलेंलें उद्गीथ
नवविद्या उदयाचलस्था ॥४॥
स्वस्ति! नारायणि!स्वस्ति!शुक्लबीजावतंसे!
स्वस्ति! मुक्ताकारे! कर्पूरकाये कंकैलासे!
शाखांबरि! ‘शं’स्थे! श्रीप्रत्यक्भानभासे
अलख्नंदे! नमस्तुभ्यम! ॥५॥
दुपारी ०३.३०
फेसाळलेल्या देखूंया आनंदोर्मी
दरिद्रलेले वंदू या अवधूतस्वामी!
चंडोलगति धांवूं या कंटस्थधामी ॥६॥
दुपारी ०३.३८
बेभानलेल्या जीवास आमुचा पदस्पर्श
समाधल्या चितींत आमुचा मुद्राप्रवेश
स्मशानलेल्या गृहमंदिरात आमुचा आशीर्लेश
ओळख ही अलक्ष्यखूण ॥७॥
आज्ञाचक्रास दिलेल्या आदित्यगती
कूर्मनाडीत निक्षेपिलेल्या वैश्वानरस्थिती
दहराकाशी संयोजिलेल्या बीजयुती
सफलतील यथासमय ॥८॥
पोरक्यांना घेईन अंकावरी
पतितांना मी उचलीन शिरी
पांगुळ्यांना बसवीन हिमशिखरी
अलखनंदा मी रेवणकन्या ॥९॥ दुपारी ०३.५५