जागरण-प्रक्रिया:
कर्म-ज्ञान-भक्ती या कुंडलिनी शक्तीच्या जागृतीच्या भिन्न क्रमिक अवस्था आहेत.
क्रियाशक्ती जेव्हा बहिर्मुखी असते तेव्हा भेदरूपी सृष्टी निर्माण होऊन स्वस्वरूपावर आवरण येते.
ही अचित्शक्ती. ती भेद-ज्ञान करते.
ती अंतर्मुखी झाली व विकसित झाली की अज्ञान व विक्षेप यांची निवृत्ती होते.
सद्गुरूकृपेमुळे ती विकसित व गतिमान होते.या शक्तीला श्रीगुरूशक्ती किंवा चित्शक्ती म्हणतात. तिच्यामुळे अभेद
जेव्हा जागरण पूर्ण होते तेव्हा निद्रा लेशमात्र शिल्लक रहात नाही. त्यावेळी परिपूर्ण अद्वैतसिध्दी म्हणजेच आत्मनिवेदन भक्ती होते.