१९८३ सालानंतर शांतिमंदिरमध्ये जुनी कागदपत्रे यांचा शोध घेत असताना एका लाकडी पेटीमध्ये काही जुने बिन आखलेले कागद मला सापडले. या कागदांवर पेन्सिलने लिहिलेले, वळणदार, सुस्पष्ट, सुंदर अक्षरांतील हजारो श्लोक मला दिसले. त्यात १९३८,३९,४०,४२,४५ या काळात महर्षि विनोद सरदार मेहेंदळयांना श्लोक सांगताना आलेल्या उत्कट अनुभवाचा संदर्भ मला सापडला. काही विशिष्ट दिवशी, विशिष्ट वेळी, पुण्यातील सरदार मेहेंदळेंच्या घरी महर्षि विनोद जात असत आणि अतीन्द्रिय अवस्थेमध्ये स्फुरलेल्या काव्यपंक्ती टिपून घ्यायला ते रावसाहेब मेहेंदळेंना सांगत असत.
त्याचे विलक्षण वर्णन श्रीज्ञाननाथजी रानडेंनी कथन केले आहे. ते श्लोक वाचून मी खूप भारावून गेले होते. पेटीतल्या त्या कागदांना स्पर्श करतानाच मी रोमांचित झाले होते आणि डोळयांमध्ये अश्रू आले होते. आता यापुढे हे धन आपल्यालाच जतन करायचे आहे आणि शक्य झाल्यास प्रकाशित करायचे आहे, अशी खूणगाठ मी त्यावेळेला बांधली होती. महर्षींच्या वेबसाईटवर हे सर्व साहित्य आम्ही वाचण्यासाठी ठेवले होते. याच्या e-book सी.डी. चे प्रकाशन २००८ च्या गुरुपौर्णिमेला झाले. बुक-गंगावर या वर्षी ही आवृत्ती प्रसिध्द करीत आहोत. (संपादक – डॉ. ऋजुता विनोद)
This e-book is for sell. To purchase it please click on
http://www.bookganga.com/eBooks/Book/5360923364451423078.htm?Book=Kundalini-Jagruti-Nath-Prasad
Price - Rs. 500/-