दुसरी शकुंतला, वृत्ती माझी झाली।
भृंग एक गुंजी, करी भंवतीं।।
वारितां तिज न ये, भृंग पार्थिवतेचा।
आत्मदुष्यंताचा, ठाव नाहीं।।
तया आक्रंदाया, वृत्तिला सर्वदा।
सांगे प्रियंवदा, काव्य-देवी।।
ताडपत्र काळे, निशेचें घेउनी।
लेख हा वाचुनी, कोण पाहीं।
तारकांचा अर्थ, कुठें कुठें लागे।
परी हा अज्ञात, किती भाग।