प्रकाशित साहित्य

अनंतता - महर्षी विनोद

 

अनन्तते - विषयी 

 

१)

 

अनन्त-ता हा शब्द मला १९२० च्या मे मध्ये सहज स्फुरला. त्यानंतर मी त्याचा विशेष शोध करू लागलो. अगदी आजपर्यंत अनेकानेक कल्पना, प्रतीके, प्रतिमा ध्यानात येत असतात.

 

कोठलीही मर्यादा, अन्त, परिसमाप्ती, स्वत:च्या अनुभवाला, बुद्धीला नसावी अशी एक गुप्त व सुप्त आकांक्षा प्रत्येक जीवामध्ये असतेच. ही एक मूलभूत अशी वृत्ती व प्रवृत्ती आहे. तेथे अनन्त-तेचा उगम असावा असे वाटते.

 

सान्ततेचा प्रतियोग म्हणून `अनन्त-ता' ही कल्पना असू शकेल. पण मला अभिप्रेत असलेली अनन्त-ता केवळ सान्ततेची प्रतियोगी कल्पना नव्हे. अन्ताचा अभाव म्हणजे अनन्त-ता असे मानणे स्वाभाविक वाटते; पण ही अनंत-ता अन्तावर अवलंबून असणार. मर्यादा नसणे, अमर्यादित असणे, अशा केवळ क्रिया-प्रतिक्रियात्मकतेतून जी अनन्ततेची कल्पना प्रकट होते त्याहून विलक्षण असे अनन्त-तेचे मूलस्वरूप असावे. ती अनन्त-ता सान्तता-सापेक्ष अशी नव्हे. सान्तता तिला जन्म देत असेल तर ती मर्यादित होणारच.

 

``स्थल'' व ``काल'' दोन्हीही अमर्याद, अनन्त आहेत, असे आपण समजतो. पण एका दृष्टीने आज ती दोन्हीही अमर्याद राहिली नाहीत. आपण जिला space समजतो ती मर्यादित आहे, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. त्याचप्रमाणे `काल' देखील आज निरवधी राहिला नाही. किंबहुना ``विश्व'' universe समर्याद finite आहे हे आईन्स्टाईन-सारख्या शास्त्रज्ञांनी सिद्ध व प्रसिद्ध केले आहे.

 

यावरून मला ध्येयभूत झालेल्या अनन्ततेची time व space ही प्रात्यक्षिके नव्हेत असे म्हणता येईल; तरीही त्या अनन्त-तेची ही दोन्ही व दुसरीही काही ``सूचके'' अवश्य असू शकतील यात शंका नाही.

 

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search