१२ जानेवारी १९०२ ते १३ जुलै १९६९ (-अवघ्या ६७ वर्षांचं आयुष्य) कोकणातील ग्रामीण भागातून आलेला मुंबईत शिक्षण घेणारा युवक, हळव्या मनानं इंग्रजीतून कविता करणारा कवि, अंमळनेर तत्वज्ञान मंदिरात राहून 'पी.एच.डी.' मिळवणारे तत्वज्ञानी,
थोर देशभक्त, शहीद, भगत सिंगांच्या अंतरंगातील कडवे क्रांतिकारक,
४ वर्षे भूमिगत राहून, हिमालयामध्ये (भारत व तिबेट) सर्वदूर व अगम्य ठिकाणी पदभ्रमण केलेला, सद्गुरूंचा शोध घेणारा साधक-यात्री,
अनंतता-क्षुद्रता-ब्रह्मास्मि या विषयांवर अभंग रचणारा व ते गुणगुणणारा संत,
नाथपंथातील थोर सिध्दपुरुष (शंकरदास),
देशोदेशी विद्वत्-सभा गाजवणारा उत्तम वक्ता,
षट्-दर्शनांचे जाणकार-'दर्शनालंकार',
करवीर पीठाच्या शंकराचार्यानी गौरविलेले 'न्यायरत्न',
३ वर्षे, जगातील प्रत्येक देशात शांतिचा संदेश देणारे व टोकियो मध्ये गौरविलेले 'विश्व-शांति-सचिव',
विविध देशांतील, दुर्गम स्थळी असणार्या व अतींद्रिय शक्ती असणार्या साधू-संत-सत्पुरुष-सिध्द-महात्मे यांच्याशी भेट-चर्चा केलेले जिज्ञासू,
न्यूयॉर्क मधील आधुनिक व अभिनव प्रयोगशाळेत, डॉ. फायफर यांना, स्वतःच्या अतींद्रिय शक्तींवर संशोधन करू देणारे महान योगी,
डॉ. फ्रॉईड प्रणीत संस्थेमध्ये सायकोएनालिसिस या विषयात पी.एच.डी. केलेले 'सायकोथेरपीस्ट',
नोबेल विजेते डॉ. आईन्स्टाईनशी गणित विषयावर चर्चा करणारे संशोधक,
देशोदेशीच्या विद्वान-साहित्यिक-तत्वज्ञानी-विचारवंत-समाजसुधारक-कलावंतांशी अंतरंगाचं नातं असणारा सुहृद,
ग्रामीण अशिक्षित शेतक-यापासून ते आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व्यक्तीशी आपुलकीचा संवाद साधू शकणारा साधू,
भारतीय ज्योतिषशास्त्राचा गाढा अभ्यासू,
मंत्रशास्त्र-तंत्रशास्त्र-यंत्रशास्त्र जाणणारी अधिकारी व्यक्ती,
कनवाळू अंतःकरणाची, भक्तवत्सल गुरू-माऊली,
वाचकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, उच्च साहित्यिक मूल्ये जपून, ग्रंथ-निर्मिती करणारा साहित्यिक,
व्यासपूजा महोत्सव १९४३ मध्ये प्रथमच सुरू करणारा कृतज्ञ,
बुध्द-पौर्णिमा, आद्य शंकराचार्य पुण्यतिथी यांचे उत्सव सुरू करणारा उत्सव-प्रेमी,
३० हून जास्त लेखकांच्या पुस्तकांना आशीर्वाद देऊन, तात्विक भूमिकेतून आपले विचार पोचविणारा विचारवंत,
उपस्थितांच्य़ा आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेले विनोदी व्यक्तिमत्व,
पुणे महानगरपालिकेने गौरवलेले अध्यात्म-महर्षी,
अलिबाग नगरपालिकेने गौरवलेले कोकण-सुपुत्र,
मातृ-पितृ भक्त, प्रेमळ बंधू, पति व पिता.