महर्षी विनोद यांच्या विषयी

विश्वशांतिसचिव

विश्वशांतिसचिव (१९५१ ते १९५४)वृत्तपत्रातील बातम्या:

 

दौ‍याचा हेतू:

१) भारतीय संस्कृती व तत्वज्ञानाचा प्रचार आणि

२) परदेशांतील सांस्कृतिक केंद्रांचा अभ्यास

 

२५ मे १९५१ ला परदेशी दौऱ्यासाठी रवाना...

विश्वशांति-दूत या नात्याने महर्षीचे अनुभव:

 

२५ मे १९५१ रोजी न्यायरत्न विनोद विमानमार्गे प्रथम रोम शहरी गेले व तेथपासून व्याख्यानांना सुरुवात झाली. रोममध्ये स्वतः धर्मगुरु पोप यांनी न्यायरत्नांचे थाटाचे स्वागत केले. रोममधील ओरिएन्टल इन्स्टिट्यूट्चे डायरेक्टर प्रो. तुची व अनेक विद्वान मंडळींबरोबर त्यांनी चर्चा केली.

रोममधील सेंट फ़्रांन्सिस व सेन्ट पीटर्स कथीड्रल या दोन महान संतांवरील त्यांनी लिहिलेले लेख ’रोहिणी’ मासिकामध्ये प्रसिध्द झाले. हे लेख इतके माहितीपूर्ण होते की महाराष्ट्रातील काही चर्चमधूनही ते वाचले गेले.

फ़्रान्समधील काही सांस्कृतिक केंद्रांनाही त्यावेळी त्यांनी भेटी दिल्या.

 

१८ जून १९५१ रोजी न्यायरत्न विनोद इंग्लंडला रवाना झाले, तेथे त्यांचा चार महिने मुक्काम होता. या दरम्यान १४ राष्ट्रांना भेटी दिल्या.

या राष्ट्रांतील प्रमुख संस्थांमधून त्यांची व्याख्याने झाली. या त्यांच्या व्याख्यानांना पाश्चिमात्य पंडित, संशोधक, मंत्री वगैरे मोठ्या प्रमाणावर हजर असत.

या मुक्कामात अर्ल बर्ट्रंड रसेल, प्रो. ज्योड, प्रो. जेम्स, स्वित्झर्लंडमधील प्रो. फ़ुंके, स्वीडनमधील स्वेन हेडिन, हॉलंडधील टेन हाव्हा, बेल्जममधील होस्टे इ. अनेक जगप्रसिध्द व्यक्तिंच्या त्यांच्या भेटीगाठी झाल्या व त्यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यानेही झाली.

२४ जुलै १९५१ रोजी ब्रसेल्स (बेल्जम) येथील होटेल प्लाझाच्या टेरेसवर ’रोटरी’ या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे न्या. विनोद यांचे भाषण झाले. त्या प्रसंगी ब्रसेल्सचे अनेक थोर नागरिक, बेल्जमचे शिक्षणमंत्री हॉस्टे व उद्योग, शेतकी व परराष्ट्रमंत्री हजर होते, शिवाय बेल्जम चेंबर ऑफ कॉमर्सचे सभासदही उपस्थित होते.

नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन, जर्मन, बेल्जम आदि राष्ट्रांचा दौरा संपवून ते पुन्हा लंडनमध्ये परत आले.

उत्तर ध्रुवाच्या परिसरात (नॉर्वे) येथे जाऊन आल्यानंतर लंडन बी.बी.सी. रेडियोवरुन त्यांचे भाषण झाले.

सप्टेंबर १९५१ मध्ये त्यांनी व्हिएन्ना येथील मानसशास्त्रीय संस्थांमधील प्रयोग पध्दतीचे एक पंधरवडाभर अवलोकन व अध्ययन केले. व्हिएन्ना येथील मुक्कामात त्यांची व सौ. एमिली श्लेंकेल बोस (सुभाष बाबुंच्या पत्नी) यांची भेट झाली.

त्यानंतर ते बर्लिन व वेस्टर्न रशियन झोनमध्ये जाऊन आले. रशियन झोनमधील युनिव्हर्सिटी व अणुशक्ति संशोधन या संस्थांना त्यांनी भेटी दिल्या. म्युनिच, बाडबॅस्टिन, साल्झबर्ग व व्हिएन्ना येथे त्यांची बरीच व्याख्याने झाली.

 

६ ऑक्टोबर १९५१ रोजी ते अमेरिकेकडे रवाना झाले.

अमेरिकेतील वास्तव्यात न्यूयॉर्क शहरातील निरनिराळ्या क्षेत्रातील अनेक संस्थांमधून, चर्चेसमधून, थिएटर्समधून, सर्वत्र त्यांची व्याख्याने झाली.

’पतंजली व आधुनिक मानसशास्त्र’ या एकाच विषयावर त्यांची १६ व्याख्याने झाली.

एक प्रसिध्द बौध्द तत्व- डॉ. स्टोक्स, नामांकित फ्रेंच लेखक जॆक्स डी मार्केट, पॉल रिचर्ड, मॅडम साईडस्, एल्सी क्रापर, एक रशियन विदुषी इंद्रादेवी, बर्नाड मॅकफेडन, श्रीमंत रुथबर्त, आल्बर्ट, ग्रेस गॅझेट, मॅडम सिडेस इ. विद्वान मंडळी त्यांच्या व्याख्यानांस उपस्थित असत.

भारताच्या अमेरिकेतील परराष्ट्र वकील श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची त्या भारताकडे परतण्यापूर्वी न्या. विनोद यांच्याशी एक महत्वाची मुलाखतही झाली होती.

अमेरिकेमध्ये झालेल्या जागतिक धर्मपरिषदेमध्ये जे ८ - १० विद्वान कार्यकर्त्यांचे नियामक मंडळ बनविण्यात आले, त्यामध्ये भारतातर्फे व पूर्वभागातर्फे न्यायरत्न विनोद यांची निवड झालेली होती.

शाश्वत जागतिक धर्म परिषदेला ता. २० फेब्रुवारी १९५२ रोजी युनायटेड स्टेट गव्हर्नमेंटचा चार्टर मिळाला. यू.नो.च्या सहाय्याने सर्व राष्ट्रांत ही धर्मसंस्था स्वतःची केंद्रे स्थापून जागतिक शांतिसाठी धर्म भावनांचा समन्वय करण्याचे महत्कार्य करीत राहील. जस्टिस रोपर व न्यायरत्न विनोद हे या संस्थेच्या संस्थापकांपैकी दोन प्रमुख कार्यकर्ते असून, डॉ. होल्मस्, लुई मम्फर्ड, डॉ. स्नायडर, त्याचप्रमाणे आयन्स्टाईन, आल्बर्ट स्वायट्झर वगैरे अनेक महापुरुषांचे सक्रीय सहाय्य या संस्थेस लाभले. या कार्यासाठी न्या. विनोद यांचा अमेरिकेतील मुक्काम अधिकाधिक वाढत गेला. कोणताही सरकारी हुद्दा नसताना, भारतातील कोणत्याही संघटनेचा पाठिंबा नसताना, द्रव्याचेही पाठबळ नसताना केवळ विद्वत्तेवर जगातील विद्वानांत त्यांनी ’आपले’ असे एक विशिष्ट स्थान निर्माण केले आहे ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट होती.

 

७ एप्रिल १९५२ रोजी पायलटस क्लब या स्त्रियांच्या संस्थेत एका महत्वाच्या भोजनप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून न्यायरत्नांचे भाषण झाले. ४० स्रिया यावेळी उपस्थित होत्या. हेलन होफमन या संस्थेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष वॉशिंग्टनहून मुद्दाम आल्या होत्या.

११ एप्रिल १९५२ रोजी गुडफ्रायडे या ईस्टर मधील महत्वाच्या दिवशी न्यूयॉर्क येथील पार्क शेरिटन हॉटेलमध्ये आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे अध्यक्ष डॊ. होनिग यांच्या अध्यक्षतेखाली न्या. विनोद यांचे व्याख्यान झाले. यावेळी न्यूयॊर्क येथील ’सी’ या सामाजिक वृत्तपत्राचे संपादक श्री. रोलंड जारमन व सौ. जारमन हेही उपस्थित होते. न्यूयॉर्क येथील प्रसिध्द मंडळी बहुसंख्येने हजर होती.

१४ जून १९५२ ’सी’ मासिकाचे संपादक रोलंड गॆमन आणि प्रेसिडेंट हेरॊल्ड लॆटहॆम यांच्या आग्रहाच्या विनंतीवरुन युनिव्हर्स्लिस्ट चर्चेस व लेमेन असोसिएशन या अमेरिकेतील पुरोगामी धार्मिक संस्थेच्या वार्षिक अधिवेशनामध्ये भोजन समारंभाचे अध्यक्षीय भाषण करण्यासाठी न्या. विनोद उपस्थित राहिले होते, चार्लस टाउन, बोस्टन मॆसॆचुसेटस या अत्यंत रमणीय अशा एका अरण्यवाटिकेत सुंदर सरोवराच्या सान्निध्यात हे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. न्या. विनोद यांचे ’विश्वैकद्रुष्टी’ या विषयावरील भाषण एवढे प्रभावी आणि परिणामकारक झाले की, प्रेसिडेंट हेरॊल्ड लॆटहॆम यांनी न्यायरत्नांना युनिव्हर्स्लिस्ट चर्चेस व लेमेन या अमेरिकन महापरिषदेचे आजीव व सन्मान्य सभासदत्व जाहिर केले तसेच संस्थेच्या जागतिक प्रतिनिधित्वाचे अधिकारही देण्यात आले. परकिय परधर्मिय अशा व्यक्तिला असे दोन सन्मान दिल्याचा हा पहिला व इष्टतम अपवाद निर्माण केला होता.

 

जुलै १९५२:

प्रेसिडेंट रुझवेल्ट यांच्या पत्नी मिसेस रुझवेल्ट यांनी न्यायरत्नांना चहापानासाठी आमंत्रित केले होते. यावेळी अतीन्द्रिय अनुभव, त्यांचे प्रकार व स्वरुप या विषयांबद्दल विचारविनिमय झाला.

 

जुलै १९५२:

’न्यूयॉर्क ईव्हिनिंग पोस्ट’चे एक संपादक जेरोम एलिसन, जे त्यावेळी अमेरिकन राजकिय परिस्थितीबद्दल एक ग्रंथ लिहित होते, त्यासंदर्भात त्यांनी न्यायरत्नांची भेट घेतली.

 

रोम -

धर्मगुरु पोप यांच्याशी भेट

ओरिएंटल इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर प्रो.टुकी व इतर अनेक विद्वान मंडळींबरोबर चर्चा

 

फ्रान्स -

काही सांस्कृतिक केंद्रांना भेटी

युरोपमधील सर्व महत्वाच्या शहरांतील सांस्कृतिक केंद्रांना भेटी व विद्वानांशी चर्चा

१८ जूनला लंडनला पोहोचले.

इंग्लंडमधील कार्य:

१४ ऑगस्ट १९५१ -बी.बी.सी.रेडिओवरून "उत्तर ध्रुवाचे परिसरात" या विषयावर भाषण रोटरी क्लबमध्ये भाषणे

बरट्रेंड रसेल, पॅथिक लॉरेन्स इ. पाश्चात्य महान व्यक्तींशी स्नेहसंबंध.

संस्थांचे सभासदत्व:

१) Fellow of the Royal Society of Arts

२) Fellow of the East and West friendship council, London

३) Fellow of the Psychical Research Society, London

अमेरिकेतील कार्य: फेब्रू. १९५१ ते एप्रिल १९५३ संस्थांचे सभासदत्व:

१) जागतिक धर्म परिषद, प्रमुख नियामक मंडळात सन्माननीय सदस्य, जस्टिस रोपर यांचे आमंत्रण

एप्रिल १९५३: Prinston

प्रख्यात शास्त्रज्ञ नोबेल पारितोषक अल्बर्ट आईन्स्टाईन यांची भेट

व्याख्याने:

विषय-स्थळ-

१) स्त्रियांच्या हाती जागतिक शांति

२) पतंजली व आधुनिक मानसशास्त्र

३) हिंदी राजकारणाचे मानसशास्त्र

४) हिंदू संस्कृतीची वैशिठ्ये

कॅनडा: १८-८-१९५२

भाषण: हिदू तत्वज्ञान

टोकियो: २७-४-१९५४

पुरस्कार:

संस्था: सर्वधर्मपरिषद

निवड: विश्वशांति-सचिव

भारतातील दौरे: ३०-१-१९५५ ते ३१-३-१९५६

शहरांची नावे: दिल्ली, नागपूर, पुणे. मुंबई, अहमदाबाद, अहमदनगर,

व्याख्यानांचे विषय:

१) हिंदु तत्वाचे आजचे स्वरूप

२) लोकशाही व वैयक्तिक जीवन

३) विश्वशांति और धर्म

४) पंडित नेहरू और विश्वशांति

सन्मान: १८-०१-१९५५

स्थळ: नवी दिल्ली, कॉन्स्टिट्यूशन क्लब

आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक व्यासपीठ

दिल्ली विश्वविद्यालयाचे उपकुलगुरू डॉ महाजनी यांच्या हस्ते मानपत्र व सत्कार

महर्षींनी दिलेला संदेश: स्वातंत्र्य-प्रेम-विश्वबंधुत्व व विश्वशांति

वृत्तपत्रे:

पुणे डेली न्यूज, प्रभात, केसरी, लोकमान्य, भारत, लोकसत्ता, नवयुग, नवाकाळ, मन्वंतर, राष्ट्रतेज, ज्ञानप्रकाश, लोकशक्ती, काळ, सकाळ, रोहिणी, महात्मा, मराठा, आजकाल, महाराष्ट्र, नागपूर टाईम्स, तरूण भारत, संध्या, समाचार, विविध वृत्त(मुंबई), गुजरात समाचार, टाईम्स ऑफ इंडिया, हिंदुस्थान स्टॅंडर्ड, हितवादी, फ्री प्रेस(मुंबई), इंडियन एक्सप्रेस

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search