एलफिस्टन कॉलेजमध्ये असतानाच भगतसिंगांसारख्या क्रांतिकारकांशी न्यायरत्नांचा जवळून परंतु गुप्तपणे संबंध आला.
त्या काळामध्ये उत्कट देशप्रीतीने ते भारून गेले होते. देशासाठी वाट्टेल ते करण्याची प्रतिज्ञा त्यांनी स्वत:च्या रक्ताने लिहून दिली होती. लोखंडाच्या तापलेल्या सळईने मांडीचे कातडे जाळताना हूं की चू न करणं ह्या क्रांतिकारकांसाठी ठेवलेल्या कसोटीमध्ये न्यायरत्न यशस्वी झाले होते. परंतु एकुलता एक मुलगा असल्याने प्रत्यक्ष कृतीमध्ये त्यांचा सहभाग घेतला गेला नव्हता.