वेणूबाईंना त्यांनी दिलेले प्रोत्साहन:
वेणूबाईंची आई लहानपणीच वारल्यामुळे त्यांच्या जडणघडणीत म.गों.चा मोठा वाटा होता. उच्चशिक्षण घेण्यासाठी त्यांनी वेणूबाईंना नेहमीच प्रोत्साहन दिले. वेणूबाईंच्या भरघोस यशाचे शिल्पकार त्यांच्या गुरूजनांपेक्षा त्यांचे वडील होत असे वेणूबाईंना नेहमीच वाटे.
वेणूबाईंनी मॅट्रिकमध्ये गणित विषयात पैकीच्यापैकी गुण मिळवावेत म्हणून त्यांनी मागील वर्षीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिका नगरवाचन मंदिरातून आणून वेणूबाईंस सोडवावयास लावल्या होत्या.
पुस्तकी शिक्षणापेक्षा त्यांनी आपल्या कृतीद्वारे धार्मिक,नैतिक व व्यावहारिक शिक्षण दिले.
’सुख दैवाने दिले,त्याबद्दल ईश्वराचे सतत आभारी राहायचे; दु:ख पुर्वकर्माने मिळले त्याबद्दल बिलकुल तक्रार करायची नाही’. ही शिकवण माधवरावांच्या आचरणातून आपोआपच वेणूबाईंच्या मनात रूजली.
म.गों. च्या व्यक्तिमत्वाचा वेणूबाईंच्या एकूण व्यक्तिमत्वावर विशेष असा प्रभाव होता.