५ जुलै १९३७ विवाहदिन
१) आगळावेगळा विवाह:
वेणूबाईंच्या भावी पती विषयीच्या अपेक्षा: विवाह म्हणजे केवळ वैषयिक भोग नव्हे असे वेणूबाईंचे मत होते.
त्यांच्या आपल्या भावी पतिविषयी विशेष अपेक्षा होत्या ज्या इतर सर्वसामान्य मुलींच्या सर्वसाधारणपणे नसतात:
१) आपला पती आपला परमप्रिय मित्र असावा.
२) त्याच्याबद्दल आपल्याला नितांत आदर असावा.
३) त्याच्याबद्दल आपल्याला नेहमी पूज्य भाव वाटावा.
४) त्याच्या मार्गदर्शनाने आपल्यातले दोष घालवून आपल्याला आत्मिक उंची देणारा असावा की ज्यामुळे आपण आपली आत्मोन्नती साधू शकू.
वेणूबाईंमधील गुण
- असामान्य बुध्दिमत्ता
- सरळ-पापभिरु स्वभाव
- मातृ-पितृभक्त
- त्या काळी राज्याबाहेर विविध मुलखांत एकटीने राहून शिक्षण घेत शिक्षिकेची नोकरी केली
- काटकसरीनॆ राहून पैसे साठविले
- संसार एकटीने हिंमतीने करण्याची तयारी
- आध्यात्मिक आत्मोन्नती साधली जावी ही इच्छा
वेणूबाईंमधील वधू या अर्थाने कमतरता:
- वय २८ वर्षे
- शिक्षण त्या काळाच्या तुलनेने बरेच झालेले त्यामुळे वर साजेसे मिळेनात
- रूप साधारण
न्यायरत्नांमधील वैशिठ्ये:
कवि
लेखक
विनोदमूर्ति
प्रेमळ व समंजस
विद्वान
सामाजिक कार्याची आवड
भारतीय संस्कृतीचा थोर वारसा असलेल्या जगद्गुरू श्रीशंकराचार्यांच्या गादीवर बसण्याची योग्यता
न्यायरत्नांच्या स्थळामधील कमतरता:
- वय ३४
- मधुमेह ३२ व्या वर्षी जडलेला
- बिजवर
- प्रभाकर नावाचा मतिमंद मुलगा
- पत्नीचा व आईवडिलांचा नुकताच मृत्यू झालेला
- संन्यास ग्रहणाचा विचार पक्का केलेला, मात्र वडिलांना मृत्यूसमयी विवाह करून वंश चालविण्याचे वचन दिलेले.
- गोवर्धन या गो-रक्षणाच्या कामात योगदान हेच काम, पूर्णवेळची नोकरी-धंदा-व्यवसाय नव्हता.
न्यायरत्नांची भावी पत्नीकडून अपेक्षा:
- आपल्या मतिमंद मुलाला स्वीकारावे.
- लग्न साध्या पध्दतीने व्हावे.
- घरातील मुख्य नातेवाईकांची अनुमति असावी.
- हितचिंतकांची पसंती असावी.
- दोघांनी प्रामाणिकपणे एकमेकांशी बोलावे.
- विवाहोत्तर काळात वाचन-लेखन-व्याख्यानदौरे-महत्वाच्या व्यक्तींच्या भेटीगाठी-सामाजिक कार्य यासाठी पत्नीकडून सहकार्य मिळावे.
समाजाच्या दृष्टीने विवाहात अडसर:
अभ्यंकर व विनोद हे दोन्ही वसिष्ठ गोत्राचे. त्या काळी सगोत्र विवाह करीत नसत.
न्यायरत्नांच्या भगिनी यमुनाबाई या कौटुंबिक आघाताने दुःखी होत्या.
वेणूबाईंचे वडील माधवराव यांना भरपूर शेतीवाडी-जमिनजुमला-आईवडील असणार्या स्थळाची अपेक्षा होती.
या विवाहाचे वैशिष्ठ्य:
- त्या काळात बालविवाह होत, हुंडा दिला जाई, रीतसर ५-६ दिवस लग्न चालत, लग्न दोन्ही घरातील वडिलधारी मंडळी ठरवीत असत.
- त्या तुलनेत
..हे लग्न वधू-वरांनी ठरविले.
..साधारण वर्ष-दिड वर्षे परस्परांच्या भेटी घेऊन एकमेकांच्या घरची व वैक्तितिक पार्श्वभूमि प्रामाणिकपणे सांगितली.
...आपल्या जवळच्या विश्वासू व्यक्तींना विवाहाची कल्पना दिली, त्यांची मते आजमावली.
..योग्य वेळी न्यायरत्नांची भगिनी हिची शास्त्रीय दाखला देऊन समजूत काढली.
...वेणूबाईंचे वडिल माधवराव यांची भेट घेऊन त्यांची अनुमति मागितली
...करवीर पीठाचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांची समक्ष भेट घेऊन विवाहासाठी अनुमति मागितली.
...लग्न नोंदणी पध्दतीने झाले. ते अभ्यंकराच्या वाड्यातील माडीत झाले.
२) वैदिक विवाह:
..लग्न वैदिक पध्दतीने भोरच्या बहिणीने व मेहुण्याने (सौ. सरस्वतीबाई व श्री. चिंतामणराव गोखले) करुन दिले. त्यावेळी मोजकी मंडळी उपस्थित होती.
..या लग्नाची बातमी अग्रेसर मराठी व इंग्रजी दैनिकांनी दिली होती.
डॉ. कुर्तकोटी यांनी वेणूबाईंचे नाव बदलून मैत्रेयी असे साजेसे नाव ठेवले.
शुक्ल यजुर्वेदाचे जनक याज्ञवल्क्य यांच्या दोन पत्नी होत्या. पहिली कात्यायनी ही गृहिणी होती. याज्ञवल्क्यांच्या मध्यमवयात त्यांनी थोर विदुषी गार्गी हिची भाची मैत्रेयी हिच्याशी दुसरा विवाह केला. दोघांना विवाहाच्या वैषयिक बाजूत फारसा रस नव्हता. ते वेद-वेदांतावरील चर्चेत रंगून जात असत.
मैत्रेयीच्याबरोबरील त्यांचे आत्म्याविषयीचे संवाद शतपथ ब्राह्मणात आलेले आहेत.
त्याप्रमाणे न्यायरत्न व मैत्रेयी यांचा विवाह परस्परपूरक व प्रतिभासंपन्न व्हावा अशी श्रींची इच्छा असावी जी खरोखरच परिपूर्ण झाली.
लग्न झाल्यावर एक सुखी व यशस्वी वैवाहिक जीवन पहाण्यासाठी ते दोघे गेले.
सासरी जाताना वेणूबाईंचे वडिल माधवराव यांनी जो आहेर केला तो वेणूबाईंनी परमुलखात शिक्षिकेची नोकरी करताना काटकसर करून जे पैसे साठवून वडिलांकडे दिले होते व काही जिन्नस केले होते ते परत दिले. इतका दोघा बाप-लेकीतला व्यवहार स्वच्छ व पारदर्शी होता.
३) जमलेले प्रतिष्ठित पाहुणे:
डॉ. कुर्तकोटी, श्री.सी.बी.आगरवाल, श्री.रावसाहेब मेहेंदळे, श्री. प्र.के. अत्रे, श्री.तात्यासाहेब केळकर, श्री. प्रा.दामले.