वेणू अभ्यंकर
जन्म : २ सप्टेंबर १९०८
व्यक्तिमत्व अतिशय अभ्यासू, दांडगे वाचन असणारी, संस्कृत-इंग्रजी-हिंदी-उर्दू वर उत्तम प्रभुत्व असलेली, उच्चविद्याविभूषित, तरीही अतिशय साधी रहाणी असलेली
सर्वसाधारण वृत्ती मोकळ्या मनाची, सरळ, नम्र, विनयी, निरलस, निगर्वी, सडेतोड, जिददी, मेहनती, स्वावलंबी, काटकसरी, स्वाभिमानी, प्रेमळ, देवभीरू, पापभीरू, कनवाळू, धार्मिक, कुटुंबवत्सल, हौशी, कृतज्ञ, दुस-यामधील गुण शोधणारी व स्वतःतील दोष हुडकून ते कमी करण्याचा प्रयत्न करणारी, ईश्वराला शरण जाणारी, गीता-ज्ञानेश्वरीतील तत्वज्ञानाचा रोजच्या जगण्यात अंतर्भाव करणारी.
व्यावसायिक गुण चोख, प्रामाणिक, विश्वासार्ह, बाणेदार, धाडसी, परखड, सचोटीची, कष्टाळू, इमानदार, अतिशय जबाबदारीने आणि आनंदाने काम करणारी .....