महर्षीची अर्धांगी मैत्रेयी

शालेय जीवनातील महत्वाच्या आठवणी

शालेय जीवनातील महत्वाच्या आठवणी:शाळेतील शिक्षक-शिक्षिका

 

 

-गोगटे मास्तर: शाळेतील पहिले विद्यागुरू. बालवर्गाचे उत्कृष्ट शिक्षक म्हणून नावाजलेले. मुलांना आत्यंतिक जिव्हाळ्याने शिकवणारे परंतू तेवढेच कडक शिस्तीचे शिक्षक.

 

-अन्नपूर्णाबाई आमडेकर: इन्फ़ंटीच्या शिक्षिका. कडक शिस्तीच्या. संन्यस्त वृत्तीने राहून आपल्या धर्माप्रमाणे वागणाऱ्या या बालविधवा वेणूबाईंना अत्यंत पूजनीय होत्या.

 

-कु.हिराबाई झिराड: मराठी पहिली व दुसरीच्या शिक्षिका. आजन्म कुमारीका राहिलेल्या या शिक्षिका अतिशय काटेकोर होत्या.वर्गपाठ व गृह्पाठ चांगल्याप्रकारे करण्याची सवय त्यांनी विद्यार्थ्यांना लावली.

 

- इंग्रजी चौथी ते सातवी असणारे गणिताचे श्रीयुत पुराणिक व शास्त्राचे श्रीयुत देशमुख या गुरूद्वयींच्या मार्गदर्शनामुळे वेणुबाईंना मॅ‍ट्रिकला भरपूर गुण मिळ्वणे शक्य झाले.

 

- मिसेस खान:  मुळच्या पाणंदीकर.त्या काळातील यांचा आंतरजातिय विवाह लक्षात रहाण्यासारखा होता.

 

-मिस् फ़िल्डिंग: अत्यंत शिस्तप्रिय,अतिशय वक्तशीर,त्यांच्या कारकीर्दीत शाळेची खुपच भरभराट झाली.

 

-हॅरिटबाई गोरे: इंग्रजी तिसरीस शिकवीत. पुण्यातील वाडिया हॉस्पिटलच्या डॉ.गोर्यांच्या पत्नी.अत्यंत शिस्तप्रिय,सुंदर हस्ताक्षर तंत्रबद्ध शिकवण्याची पद्धत. त्यामुळेच वेणूबाईंचा इंग्रजी भाषेचा पाया मजबूत झाला.

 

-मिस् दस्तूर: सहावीला इंग्रजी शिकवीत असत. इंग्लिश शिकवण्यात अत्यंत वाकबगार, चर्चात्मक पद्धतीने शिकवण्याची पद्धत.स्वतंत्र विचारांच्या पुरस्कर्त्या.

 

.....

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search