व्यावसायिक जीवन
मैत्रेयी विनोदांचे व्यावसायिक जीवन:
१) १९३३, देवी कान्ती पूर्ण माध्यमिक शाळा, डेहराडून, इंग्रजी व गणिताच्या शिक्षिका. अवांतर शिक्षण: हिंदी भाषा, एम.ए. चा अभ्यास, विणकाम, निसर्गासौंदर्याचा आस्वाद
२) १९३३-३४, हिमाचल प्रदेशमधील सिमल्याजवळील जुब्बल संस्थानातील इला नावाच्या १० वर्षाच्या राजकन्येची शिक्षिका. राणासाहेब व राणीसाहेब यांनी मुंबईत मुलाखत घेऊन आमंत्रण दिले.
अवांतर शिक्षण:
उर्दू भाषा, घोड्यावरून प्रवास करू शकणे, एम.ए. चा अभ्यास.
राणीसाहेबांकडून शिकलेल्या गोष्टी :
वीजेची बचत करणे, स्वयंपाकघरातील स्वच्छता व टापटीप करणे, वेळेवर आपल्या अडचणी कळवणे, आपल्यापेक्षा लहान मुलीबरोबर खेळून तिचे अ स्वतःचे मनोरंजन करणे, आपल्याकडे काम करणाय्रा माणसांशी प्रेमाने व शिस्तीने वागणे.
३) १९३४, कन्याशाळा, आग्रा (मुख्याध्यापिका)
...