मानलेला धाकटा भाऊ- गुरुदत्त
आग्र्याच्या मुक्कामात वेणूबाईंचे ज्यांच्या वाड्यात बिर्हाड होते , त्यांचा शाळकरी मुलगा म्हणजे गुरूदत्त,जे नंतर वेणूबाईंचे पाठच्या भावासारखे झाले.
गुरूदत्तांची मैत्री म्हणजे निष्काम सौहार्दाचा निखळ अनुभव. वेणूबाईंच्या सख्ख्या भावांहूनही काकणभर जास्त प्रेम गुरूदत्तांनी आपल्या वेणूताईवर केले.
नंतर वेणूबाई आग्रा सोडून पुण्याला आल्या. दोघांच्याही नोकरीमुळे त्यांची वास्तव्याची ठिकाणे कायमच दूर राहिली. गुरूदत्तांकडे कॉलेजचे प्रधानपद तर वेणूबाईंचा संसार व नोकरी.
त्यामुळे त्यांच्या गाठीभेटी क्वचितच होत, पत्रेही थोडीच लिहीली जात. पण या गोष्टी त्यांच्या प्रेमाच्या आड नाहीत.
न्यायरत्नांबद्दलही गुरूदत्तांना आदर होता. त्यांना कविता करण्याचा छंद होता. त्यांच्या कवितासंग्रहात न्यायरत्नांना उद्देशून त्यांनी अनेक कविता केल्या आहेत.