बी.ए., एम.ए.(एल्फिस्टन कॉलेज, मुंबई)
विद्यावाचस्पती,(तत्वज्ञान मदिर,अंमळनेर)
`मूर्तिमंत चित्कला',`आत्मस्वरूपाचा साक्षात आविष्कार',(संकेश्वर पीठाचे शंकराचार्य)
`न्यायरत्न',(करवीर पीठाचे शंकराचार्य)
`दर्शनालंकार',(केदार-तुंगनाथ विद्यापीठाचे आचार्य महिमानंद)
`विश्वशांती सचिव',(विश्वशांति परिषद)
"अध्यात्म-महर्षी" (पुणे महानगरपालिका),
"अलिबाग तालुका भूषण" (अलिबाग नगरपालिका),
"सायकोऍनालिसिसची डॉक्टरेट"(सायकोऍनालिटिक सेंटर, न्युयॉर्क)
-------------------------------------------------
महर्षींच्या बालपणापासून त्यांच्या कुशाग्र बुद्धीचा प्रत्यय घरातल्यांना आला होता.
शाळा अलिबाग तालुक्यातील अगदी छोट्या गावामध्ये होती.
इ. ५वीपासून मुंबईच्या आर्यन एज्युकेशन सोसायटी या शाळेत त्यांना दाखल केले.
शाळेत असतानाच अभिजात इंग्लिश व संस्कृत वाङ्मयाचा अभ्यास विनोदांनी केला होता.
..........
मुंबईच्या एलफिस्टन कॉलेजमध्ये त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. १९२५ साली ते बी.ए. झाले. कॉलेजमध्ये असताना बेकन, शेक्सपिअर, स्टीव्हनसन, ब्राऊनी, शेली, किटस् यांचे ग्रंथ याशिवाय मराठी साहित्य ग्रंथ कालिदास, भवभूती इ.च्या श्रेष्ठ संस्कृत वाङ्मयकृती या सर्वांचं न्यायरत्न रसग्रहण करत असत.
हस्तसामुद्रिक, मुद्रासामुद्रिक व ज्योतिषशास्त्र यांचा त्यांचा व्यासंग मोठा होता.
१९२७ साली ते एम्.ए. झाले.
...............
नंतर अंमळनेर येथील श्रीमंत प्रतापशेठ यांच्या तत्त्वज्ञान मंदिरात रिसर्च लेक्चरर म्हणून जॉईन झाले.
पाश्चात्य व पौर्वात्य दर्शन ग्रंथांचा सखोल व तुलनात्मक अभ्यास त्यांनी केला.
मधुसूदन सरस्वतींच्या अद्वैत सिद्धांत त्यांनी आत्मसात केला.
आद्य शंकराचार्यांचे शारीरभाष्य त्यांच्या अखंड चिंतनाचा विषय होता.
पातंजल योगसूत्रेही याच काळात विनोदांनी आत्मसात केली.
.....................
१९३३ साली संकेश्वर पीठाच्या शंकराचार्यांनी `मूर्तिमंत चित्कला' आणि `'आत्मस्वरूपाचा साक्षात आविष्कार अशा शब्दांत त्यांचा गौरव केला.
......................
१९३५ साली करवीरपीठाचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांनी त्यांना उच्च तर्कशास्त्रातील म्हणजे भारतीय न्यायदर्शनातील विद्वत्तेबद्दल `न्यायरत्न' ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला
आणि आपल्या पीठाचे भावी अधिकारी म्हणून त्यांचे नाव जाहीर केले.
.................
१९२८ सालापासून त्यांनी हिमालयामध्ये अनेक वेळा भ्रमण केले.
गंगोत्री, जमनोत्री, केदार, बद्री, वसुंधरा, सतोपंथ इथपर्यंत त्यांनी प्रवास केला. सिद्धपुरूषांच्या भेटी घेतल्या.
दुर्गम गुहांमध्ये बसलेल्या तपस्व्यांची दर्शने घेतली. या संचारातच त्यांच्यावर सिद्ध सद्गुरूंचा अनुग्रह झाला. श्री बीजाक्षर विद्या प्राप्त झाली. ओंकार मान्धाता येथील मायानंद चैतन्य यांच्या आश्रमात ते काही दिवस राहिले होते.
केदार तुंगनाथ विद्यापीठातर्फे तेथील आचार्य महिमानंद यांनी विनोदांना `दर्शनालंकार' ही पदवी दिली.
.............
१९५४ साली टोकियोला भरलेल्या विश्वशांती परिषदेमध्ये न्यायरत्नांना `विश्वशांती सचिव' ही बहुमानाची पदवी मिळाली.
१९५८ मध्ये पुणे नगरपालिकेच्या शतसंवत्सरिक उत्सवाच्या प्रसंगी डॉ.चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते न्यायरत्नांचा `अध्यात्ममहर्षि' म्हणून सत्कार झाला.
.................
अलिबागेच्या नगरपालिकेनेही महर्षींचा अलिबाग तालुक्याचे भूषण म्हणून यथोचित सत्कार केला.
सायकोऍनालिसिस या विषयाच्या त्यांनी केलेल्या अभ्यास संशोधनाबद्दल अमेरिकेतील संबंधित विषयाच्या शिक्षणसंस्थेकडून `डॉक्टरेट' त्यांना देण्यात आली होती.