महर्षीं विषयी

सर ऑलिव्हर लॉज यांचे ग्रंथ वाचल्यामुळे विनोदांचे लक्ष अतींद्रिंय शास्त्राकडे वयाच्या १५-१६व्या वर्षी प्रथम वेधले गेले.
त्यांच्या घराजवळच्या एका चमत्कृतीपूर्ण ठिकाणी घडलेल्या काही गोष्टींमुळे त्यांची जिज्ञासा तीव्रतर होत राहिली.

पंडित मदनमोहन मालवीय यांच्या मदतीमुळे गूढविद्यांची गंगोत्री, तिबेट येथे जाण्याचा त्यांना योग आला. तिथे त्यांनी अनेक मठ व गुहा पाहिल्या. तिबेटमध्ये व हिमालयातील अनेक ठिकाणी काही सिद्धपुरूष, सिद्धीशास्त्रातील रहस्ये यांच्याशी त्यांची ओळख झाली. तंजावर व दरभंगा येथील ग्रंथालयात अतींंद्रिय शास्त्रावर संस्कृतमध्ये लिहिलेले अनेक ग्रंथ व हस्तलिखिते त्यांनी वाचली. प्रसिद्ध मीमांसक यामुनाचार्य यांचा `सिद्धीत्रय' हा ग्रंथ त्यांनी अभ्यासला. इजिप्तमधील पिरॅमिडस्च्या अवतीभवती राहणारे फकीर त्यांना भेटले. दक्षिण फ्रान्समधील सेंट बरनाडेट या पाश्चात्य महिलेने जगद्विख्यात केलेल्या `लुर्डज्' येथील अनेक चमत्कार त्यांनी पाहिले. स्वीडन व नॉर्वे या देशातील अशीच काही अद्भुत स्थळे त्यांनी पाहिली. रशियाच्या वायव्य सरहद्दीवरील व प्रत्यक्ष उत्तर धु्रवाजवळील प्रदेशात त्यांनी संचार केला. तेथे Lap Landers या आदिवासींच्या जातीतील काही व्यक्ती त्यांना भेटल्या. दुभाषांच्या सहाय्याने या आदिवासींना या शास्त्रातील जेवढी माहिती होती ती त्यांनी मिळविली. जपान, फिलीपिन्स, कंबोडिया, सियाम, चीनची न्यू टेरीटरी, हाँगकाँग, ब्रह्मदेश इ. सर्व अतिपूर्वेकडील प्रदेश व आग्नेय आशियातील प्रदेशांमध्ये ते जाऊन आले. त्या त्या ठिकाणी परिणत झालेल्या अतींद्रिय अनुभवशास्त्राच्या प्रक्रिया त्यांनी पाहिल्या.
अमेरिकेत नॉर्थ क्रॅरोलिना या राज्यामध्ये असणाऱ्या ड्यूक युनिर्व्हसिटीमध्ये डॉ.ऱ्हाईन यांच्या प्रयोगशाळेमध्ये चाललेले मूलगामी संशोधन त्यांनी स्वत: पाहिले.


या संस्थेशी त्यांचे वैचारिक सहकार्य व पत्रव्यवहार शेवटपर्यंत चालू होता.

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search