आजारपण:
जुलै १९६९ मध्ये महर्षींच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला जखम झाली होती. वेदना असह्य झाल्या होत्या. गॅंगरीन झाले होते. डायबेटीस वाढला होता. पुण्यातील डॉ. घारपुरे यांच्या दवाखान्यात त्यांच्यावर उपचार चालू होते.
डॉ. सरदेसाई यांनी मुंबईला बॉम्बे हॉस्पिटलला जाऊन डॉ. टी.पी. कुलकर्णी यांच्याकडून पायातील संपूर्ण रक्तनलिका बदलावी असा सल्ला दिला.
महर्षिंच्या मनाविरुध्द घरातील जवळच्या नातेवाईकांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. वाटेत बरीच विघ्न आली. महर्षींनी त्या वेदनामय परिस्थितीतही हलकंफुलकं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न केला. मुंबईला पोचायला उशीर झाला. डॉ. नी दुसऱ्या दिवशी ११ वा तपासले. तोपर्यंत कमरेपर्यंतचा भाग बधीर झाला होता.
रात्री उशीरा ऑपरेशन सुरु झाले. ते सहा तास चालले. पहाटे त्यांना बाहेर आणले. ते शुध्दीवर आले नाहीत. कालांतराने त्यांचे देहावसान झाले.
वृत्तपत्रे:
२८-५-१९६९ ते १३-०७-१९६९
महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता,