महर्षीची अर्धांगी मैत्रेयी

मैत्रेयी विनोदांचे शैक्षणिक यश:
शालेय:

- पुण्याच्या हुजुरपागा शाळेत मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण
- प्रत्येक वर्षी प्रथम क्रमांक
- १९२६ या वर्षी मुंबई विभागात (सुरत ते कारवार) मॅट्रिकला "सर्वप्रथम".

Image
Image

रामभाई स्कॉलरशीप व ४ वर्षे कॉलेजची स्कॉलरशीप व फ़्रीशिप, सोन्याचे घड्याळ, फौऊंटन पेन, व चांदीचे भांडे

Prizes won by Miss Venu Abhyankar:
1) The Chatfield Prize
2) The Narayan M. Parmanand Prize
3) The Dosabhai framji Kama Scholarship

शालेय जीवनातील महत्वाच्या आठवणी:शाळेतील शिक्षक-शिक्षिका


-गोगटे मास्तर: शाळेतील पहिले विद्यागुरू. बालवर्गाचे उत्कृष्ट शिक्षक म्हणून नावाजलेले. मुलांना आत्यंतिक जिव्हाळ्याने शिकवणारे परंतू तेवढेच कडक शिस्तीचे शिक्षक.

-अन्नपूर्णाबाई आमडेकर: इन्फ़ंटीच्या शिक्षिका. कडक शिस्तीच्या. संन्यस्त वृत्तीने राहून आपल्या धर्माप्रमाणे वागणाऱ्या या बालविधवा वेणूबाईंना अत्यंत पूजनीय होत्या.

-कु.हिराबाई झिराड: मराठी पहिली व दुसरीच्या शिक्षिका. आजन्म कुमारीका राहिलेल्या या शिक्षिका अतिशय काटेकोर होत्या.वर्गपाठ व गृह्पाठ चांगल्याप्रकारे करण्याची सवय त्यांनी विद्यार्थ्यांना लावली.

- इंग्रजी चौथी ते सातवी असणारे गणिताचे श्रीयुत पुराणिक व शास्त्राचे श्रीयुत देशमुख या गुरूद्वयींच्या मार्गदर्शनामुळे वेणुबाईंना मॅ‍ट्रिकला भरपूर गुण मिळ्वणे शक्य झाले.

- मिसेस खान: मुळच्या पाणंदीकर.त्या काळातील यांचा आंतरजातिय विवाह लक्षात रहाण्यासारखा होता.

-मिस् फ़िल्डिंग: अत्यंत शिस्तप्रिय,अतिशय वक्तशीर,त्यांच्या कारकीर्दीत शाळेची खुपच भरभराट झाली.

-हॅरिटबाई गोरे: इंग्रजी तिसरीस शिकवीत. पुण्यातील वाडिया हॉस्पिटलच्या डॉ.गोर्यांच्या पत्नी.अत्यंत शिस्तप्रिय,सुंदर हस्ताक्षर तंत्रबद्ध शिकवण्याची पद्धत. त्यामुळेच वेणूबाईंचा इंग्रजी भाषेचा पाया मजबूत झाला.

-मिस् दस्तूर: सहावीला इंग्रजी शिकवीत असत. इंग्लिश शिकवण्यात अत्यंत वाकबगार, चर्चात्मक पद्धतीने शिकवण्याची पद्धत.स्वतंत्र विचारांच्या पुरस्कर्त्या.

.....
* त्या काळातील नाटय प्रयोग:
त्या काळात शाळेत मुली नाटके बसवत. नाटकात मुलींनी पुरूषाची भुमिका केली तरी तसा वेष करण्याची पद्धत त्यावेळी नव्हती. पात्रांच्या भाषणावरून पात्रे ओळखली जात, पोषाखावरून नव्हे. प्रेक्षकांना त्याचे काही वाटतही नसे.

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search