म.गों.ची धार्मिकता
वेणूबाई व म.गो. यांनी केलेल्या यात्रा (१९२६-२८). माधवराव व वेणूबाईंनी अनेक तीर्थक्षेत्रांचा प्रवास केला. माधवराव व वेणूबाई हे तीर्थयात्रा करीत असताना, ईश्वर कसा आपल्या भक्तांचा सांभाळ करतो हे नेहमी वेणूबाईंच्या निदर्शनास आणून देत. आगगाडीचे तिकीट मिळण्यापासून धर्मशाळेत जागा मिळेपर्यंत ईश्वरी साहाय्याचे क्षण ते टिपीत व वेणूबाईंच्या मुद्दाम लक्षात आणून देत.
स्थळं:
दक्षिण भारत: १९२६
बदामीची कोरीव लेणी, बनशंकरी देवी, हुबळी:सिध्दारूढस्वामी समाधी, हरिहर, म्हैसूर,चामुंडा, श्रीरंगपट्टणम, दौलत (टिपूचे थडगे), बंगलोर, कोलार (सोन्याच्या खाणी), कांची, चिदंबरम, कुंभकॊण, तंजावर, मदुराई, रामेश्वर, श्रीरंग, मद्रास, तिरुपती बालाजी
उत्तर भारत: १९२७
बोरीबंदर-टांकसाळ-वसई-बडोदे-आगड-जवाहिरखाना-डाकोर-उज्जैन-भोपाळ-ग्वाल्हेर-आग्रा-मथुरा-दिल्ली-लखनौ-अयोध्या-प्रयाग-काशी-केदारनाथ-गोकुळ-कुरुक्षेत्र-ठाणेश्वर-हरिद्वार-ऋशीकेश(लक्ष्मणझुला)-बद्रीनाथ
: १९२८
श्रीशैल्यम-श्री मंगेश, शांतादूर्गा, द्वारका, गिरनार, वेरावळ, प्रभास, सोरटीसोमनाथ, पुष्कर, जयपुर, जळगाव, अजिंठा
माधवरावांना भिक्षुकांबद्दल आदर होता. ते ’गुरूजी’ या आदर-संज्ञेने भिक्षुकांचा उल्लेख करीत.
माधवराव नित्य व नैमित्तीक धार्मिक कार्यक्रम पार पाडीत परंतु त्या निमित्ताने आप्तेष्टांना आमंत्रणे देऊन उगीच जेवणारांची संख्या वाढवत नसत.
दुपारी तीनच्या सुमारास ते दुधातली अर्धी दशमी खाऊन काशीकरबुवा,कराडकरबुवा यांच्यासारख्याच्या कीर्तनास अगर पाववीशास्त्र्यांच्यासारख्या विद्वद्वरेण्याच्या पुराणास जात.कथेकरीबुवांनी काही नवे श्लोक सांगितले तर ते टिपून घेण्यास ते कधी विसरले नाहीत.

लोकमान्यांशी असलेली मैत्री:
माधवराव म्हणजे कट्टर लोकमान्य भक्त. केसरी व ज्ञानप्रकाश आणि टाईम्सचे वाचक. परंतु वेणूबाईंच्या घरी फक्त केसरी येत असे.
लोकमान्यांच्या पुढील राजकारणात त्यांनी कधीही रस घेतला नाही, परंतु लोकमान्यांच्या हयातीत मात्र त्यांनी सार्वजनिक कार्यात भाग घेतला.
पुणे वसंतव्याख्यानमालेचे चिटणीस म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. उपवक्ते म्हणून त्यांची बरीच ख्याती होती.
ते रंगमंचावर बोलू लागले की टाळ्यांचा कडकडाट होई.
वेदशास्त्रोक्त सभा, सार्वजनिक सभा या संस्थांच्या कार्यातही त्यांना रस होता. पुणे नगर वाचन मंदिर म्हणजे तर त्यांची सर्वप्रिय संस्था.
माधवरावांच्या शिफारशीची पुस्तके व मासिके वाचनालय नेहमी घेई.
लोकमान्यांच्या सहवासाचे आणखी एक दृश्यफल म्हणजे माधवरावांचा रामायण, महाभारत व भगवदगीतेचा गाढा अभ्यास.
संस्कृत अभ्यासामुळे त्यांना भारतीय अध्यात्मग्रंथांचाही परिचय होता. कवि कालिदास त्यांचे विशेष आवडते होते. माधवरावांना संस्कृत सुभाषितांची अतोनात आवड, ते नेहमी सुभाषितांतच बोलत.

माधवरावांचे एकूण व्यक्तीमत्व
कर्तृत्ववान व आज्ञाधारक तसेच शिक्षणप्रेमी. म.गो.हे अत्यंत काटकसरी होते.
अत्यंत स्वाभिमानी परंतु समाजाशी फटकून वागणारे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.
तसेच संपूर्ण स्वावलंबन हे त्यांचे ब्रीदवाक्य होते.
माधवराव स्वत: विद्वान होते.
वाचनाच्या व अभ्यासाच्या आवडीबरोबरच त्यांना प्रवासाचीही आवड होती.
स्वभाव : माधवरावांसारख्या स्वाभिमानी व समाजाशी फटकून वागणार्या व्यक्तींची करमणुकीची साधने म्हणजे कथा, प्रवचने, वाचन, व्याख्याने हीच असत.
माधवरावांच्या स्वभावविशेषामुळे ते कधी कुणाच्या घरी जात नसत व कोणाला आपल्याकडे गप्पाट्प्पा करण्यास बोलावत नसत. वेणूबाईंनाही त्यांनी कधी नातेवाईक अगर मैत्रिणींकडे जाऊ दिले नाही.
माधवरावांची स्वत: ज्ञान घेण्याची सवय जन्मभर टिकली. निरनिराळी प्रदर्शने पहाणे, ऐतिहासिक व धार्मिक स्थळे पहाणे, व्याख्याने ऐकणे हा त्यांचा छंद होता.
माधवराव अतिबुध्दिमान होते. परंतु माधवराव अतिशय तापट स्वभावाचे होते. त्यांचा व त्यांच्या बुध्दिमत्तेचा दबदबा असे पण ते हळवेही होते.
प्रवासाचीही त्यांना आवड होती. त्यांना पायी प्रवास करणे खूपच पसंत होते. संपूर्ण रत्नागिरी जिल्हा त्यांनी पायी प्रवास करून पाहिला होता.
वेळच्यावेळी जेवण व झोप या त्यांच्या परिपाठामुळे त्यांचे ७४ वर्षांचे आयुष्य आरोग्यसंपन्न व सुदृढ होते.
वेणूबाईंची आई जिवंत होती तोपर्यंत माधवराव रात्री साडेआठला जेवत. तत्पुर्वी तास-दीड तास आळीतच असणार्या मामा शेडाणीकर, वैद्यांकडे सोंगट्या खेळत. साडेआठाच्या आसपास नवा डाव त्यांनी कधीही सुरू केला नाही. पुष्कळ वेळा डावही अर्धवट टाकीत, पण घरी वेळेवर येत. खेळात माधवराव चांगले अगर वाईट कसेही दान पडले तरी शांत असत. ते कधीही आवाज चढ्वत नसत. क्षुल्लक खेळातील जयापजयाने आपली मनःशांति ढ्ळू देणारे ते नव्हते. माधवरावांना गंजिफाही येत. वेणूबाईंनाही त्यांनी त्या थोड्या शिकवल्या होत्या.
पोषाख: माधवरावांना जनमताची कधीच भीड वाटत नसे. उदाहरणार्थ त्यांचा पोषाख- ऋतूमानाप्रमाणे तो बदले. ते उन्हाळ्यात धोतर-उपरणे व गांधी टोपी वापरत. पावसाळ्यात कधीचा सदरा घालीत तर हिवाळ्यात कोट, कानावरून ओढ्लेली गांधीटोपी , हातात हातमोजे, पायात पायमोजे घालून वर पुणेरी जोडा घालीत.
तो पोषाख फारच विचित्र दिसे. लोक हसत पण माधवरावांना त्याची पर्वा वाटत नसे. तारूण्यात पगडी घालणारे माधवराव नंतर गांधीटोपी घालू लागले. त्यांनी सोयीकरता केवळ हा बदल केला. गांधीटोपी हलकी असते, वारंवार घेता येते, थंडी वाजू लागली की कानावरून घेता येते तर वेळप्रसंगी बाजारात घेतलेले पदार्थ ठेवण्यास उपयोगी पडते. यासारख्या अनेक सोयींमुळे माधवराव गांधीटोपी वापरू लागले. परंतु समारंभ प्रसंगी ते पगडीच वापरीत.
पोषाख माणसाच्या स्वत:च्या सुखाकरीता असतो, दुसर्यांना दृष्टिसुख देण्याकरता नव्हे, त्यामुळे सायकलवरून जाताना ते त्याकाळी प्रचलित असलेली मडमांची हलकी व रूंद पट्टीची टोपीही घालत. लोकांच्या टीकेची त्यांना कदर वाटत नसे. पोषाखात सभ्यता व स्वच्छता या दोन गोष्टींना महत्त्व आहे, इतर बाबी गौण आहेत असे त्यांचे मत होते. माधवरावांची ही निडर वृत्ती वेणूबाईंच्यात आली होती.

वेणूबाईंना त्यांनी दिलेले प्रोत्साहन
वेणूबाईंची आई लहानपणीच वारल्यामुळे त्यांच्या जडणघडणीत म.गों.चा मोठा वाटा होता. उच्चशिक्षण घेण्यासाठी त्यांनी वेणूबाईंना नेहमीच प्रोत्साहन दिले. वेणूबाईंच्या भरघोस यशाचे शिल्पकार त्यांच्या गुरूजनांपेक्षा त्यांचे वडील होत असे वेणूबाईंना नेहमीच वाटे.
वेणूबाईंनी मॅट्रिकमध्ये गणित विषयात पैकीच्यापैकी गुण मिळवावेत म्हणून त्यांनी मागील वर्षीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिका नगरवाचन मंदिरातून आणून वेणूबाईंस सोडवावयास लावल्या होत्या.
पुस्तकी शिक्षणापेक्षा त्यांनी आपल्या कृतीद्वारे धार्मिक,नैतिक व व्यावहारिक शिक्षण दिले.
’सुख दैवाने दिले,त्याबद्दल ईश्वराचे सतत आभारी राहायचे; दु:ख पुर्वकर्माने मिळले त्याबद्दल बिलकुल तक्रार करायची नाही’. ही शिकवण माधवरावांच्या आचरणातून आपोआपच वेणूबाईंच्या मनात रूजली.
म.गों. च्या व्यक्तिमत्वाचा वेणूबाईंच्या एकूण व्यक्तिमत्वावर विशेष असा प्रभाव होता.