सरस्वतीबाई गोखले
बायजाबाईला त्यांचे वडील सोन्या म्हणत असत. वडीलांच्या त्या फार लाडक्या होत्या. त्या स्वभावानं चटपटीत व चलाख होत्या. बायजाबाईंना ते लोकमान्यांकडे नेत असत. बायजाबाईंना शिकवायची वडीलांची फार इच्छा होती. पण त्यांना संसारात अधिक रस असल्यामुळे ती राहिली. ती इच्छा त्यांच्या सर्वात धाकट्या व नावडत्या लेकीने-वेणूनं अनेकपटीनं पूर्ण केली.
भोरला त्यांचे सासर. त्यांचे नाव सरस्वतीबाई गोखले. बायजाबाईंचे सासरे भोरच्या संस्थानिकांचे राजवॆद्य होते. त्यांना वाचनाची खूप आवड होती. भोरचॊ जुनी मंडळी त्यांना गोखलेवहिनी म्हणून ओळ्खतात.
मॆत्रेयीबाईंच्या बाळंतपणानंतरची देखभाल बायजाबाईंनी केली व आईची उणीव अंशतः भरून काढली.
बायजाबाईंचा एक मुलगा श्री. दिगंबर यांना विनोदांकडेच मदतनीस व ड्रायव्हर म्हणून ठेवून घेतलं होतं.
बायजाबाईंच्या मुली मावशीकडॆ म्हणजे मॆत्रेयीबाईंकडे मोठ्या कार्यक्रमांत मदतीला असत. त्यांची लग्ने जुळविण्यात मॆत्रेयीबाईंचा मोठा हातभार होता.
बायजाबाईंनी स्वतःचा मोठा संसार पतीच्या मागे धीरानं केला. त्या नेहमी हसतमुख असत. नातवंड-पतवंड त्यांनी पाहिली. आई-वडील-बंधू-भगिनी-सासू-सासरे-पती आणि स्वतःची काही अपत्ये यांचा मृत्यू त्यांनी सोसला.