समाजस्थंडिली, स्वार्थाची आहुति
हीच यज्ञरिति, व्यक्तिमात्रा
तन्तुत्वाचा त्याग, पटाच्या सिद्धीला
बिन्दुत्व सिंधूला, समर्पण ॥१॥
शरीरा कारणे, इन्द्रियां गौणत्व
समाजास स्वत्व, वाहियेले
‘स्व’ च्या सिंहासनी, ‘पर’ ला बसवूं
स्व-पर लोपवू, एकत्वांत॥२॥
व्यष्टि विटेवरी, रखुमाई समष्टि
विठ्ठल परमेष्टि, शोभता न
जीवी जीवाठायी, वसे ही पंढरी
घडो तेथ वारी, सर्वकाळ॥३॥
१९२५ ऑक्टोबर