अभंग

अप्रकाशित अभंग डिसेंबर १९५८

 

जन्मोजन्मी झाल्या तुझ्या माझ्या गांठी।

एक-मेकांसाठी फिरत सूं (जीव झुरती) ॥

हात हाती आहे कायमचा घेतला।

प्रवास चालला अखंड की ॥

संपेल हा कधी ? नाही का संपेना।

एकमेका विना जाणें नसे ॥

म्हणूनी ना मजला वाटतो कंटाळा।

सुखाचा सोहळा प्रवास हा ॥१४७॥

 

थराथरले अंग जेव्हा तुझा झाला स्पर्श।

उरले नाही भान वातावरणीं सांडे हर्ष ॥

जीविताचें तारूं नाचे आनंद सलिली।

सुख स्वप्ने सारीं सत्य सृष्टीमध्ये आली ॥१४८॥

 

नाहिं जा येणार आतां तुझ्याकडे।

बाळ हे बापुडे कालत्रयी ॥

गटी फू सदाची तुझी माझी झाली।

इच्छा न राहिली भेटण्याची ॥

येतां तुझ्याकडें ‘कां तूं येसि’ ऐसें।

विचारीसी कैसें मला सांग? ॥

नाहिंना पुन्हां तू ऐसे पृच्छणार।

सांग ना लवकर एकदांची ॥

थट्टा सुद्धा नको करूं भलतीच।

माझा ती जीवच घ्यावयाची ॥१४९॥

 

१-१२-५८

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search