२५ जानेवारी:
एकूण श्लोक: ४
संध्याकाळी ०१.३०
तुम्ही पाहतां फळें।
आम्ही देखतों मुळें।
साहित्यदर्पणीं बीजबुबुळें।
शब्दशब्दांत चमचमतीं ।। ।।१।।
तुम्ही मांडा शब्दसंदर्भांचा संसार।
आम्ही न्याहाळूं तेथिंचा बीजमूलाधार।
सुवर्ण आमुचे तुमचे अलंकार।
‘प्र’ आम्ही तुम्ही ‘कृति’ ।।२।।
मोज मोजा तुम्ही पाक पाकळी ।
आम्ही भोगू गर्भगंधबकुळी ।
सुखेन हुडका अवकाश पोकळी ।
आम्ही डोळवूं नक्षत्रे ।। ।।३।।
क्षरनाट्याचें हें लाघव।
बीजस्वांचा लीलाविर्भाव।
चिरसत्त्वांचा मुहूर्तमेळाव।
अवस्थात्रय जीवचितिचें ।।४।।