२८ नोव्हेंबर:
एकूण श्लोक: ९
संध्याकाळी ६.००
निवृत्ति प्रतिष्ठा विद्या ।
शांति शांत्यतीता स्वसंवेद्या ।
पंचकला या प्रतिपाद्या ।
‘शं’ विद्येत ।। ।।१।।
पंचवीस तत्त्वें योग-सांख्यांची।
चोवीस पांचरात्रांची।
बत्तीस वैष्णवांची।
‘शं’ विद्येंत छत्तीस ती! ।।२।।
संग्रह दर्शक हें महाव्यापक।
तत्त्वमात्रास अंतर्भावक।
सर्वानुभूतीचें निर्देशक।
अतएव छत्तीस तत्त्वें ।। ।।३।।
रेणु एक न राहील वेगळा।
केसर एक न होईल मोकळा।
पूर्ण चंद्रिकेच्या बिंबी कलाकला।
समन्वयल्या ।। ।।४।।
पृथ्वी आपतेज पवन।
आणि अवकाश हें पंचम भुवन।
किंवा चतुर्व्याहृतींचा चतुष्कोन।
द्विविध भुवन संख्या ।।५।।
‘शं’ विद्येंतील पहिले तीन।
कला, तत्त्व, आणि भुवन।
शं - संश्रितांनीं पायदळलें अध्वान।
मल्हार मार्ग हे महानुभूतीचे! ।। ।।६।।
नंतरी वर्णमार्ग विस्तारला।
अनुनासिकांत संपूर्णला।
शब्दमार्ग जागरला।
शब्द म्हणजे वर्णसंघ ।। ।।७।।
शब्दाशब्दांचा साभिप्राय मेळव।
तेथ वर्णबीजांची सहेतुक खेळव।
अक्षर गूढ शक्तींची चेवव।
या नांव ‘मंत्र’ ।। ।।८।।
‘शं’ विद्येंतील द्वितीय त्रयपंथ।
षण्मार्ग हे द्वादश मल्हारांचे।
वेद, शिव, वैष्णव।भाव, दक्षिण आणि वाम भाव।
सिद्धांत कौल हे श्रेणीद्वय।अष्टाचार हे ‘शं’ शास्त्रींचें ।। ।।९।।