गंजले लोखंड, आत्मतत्वाचे या
हिरण्मय तया, रूप यावे
तरी अन्त्यजांचा, करा स्पर्श व्हावा
परिस ओळखावा, दिव्य तोच
ख्या अन्त्यजा ये, असा बैस येथे
तुझे माझे नाते, जरा ऐक
तूच माझा देव, तूच माझा धर्म
एवढे सत्कर्म, तुझी सेवा
असावी मस्तकी, तुझी पायधूली
देवता न उरली, मला दुसरी