१९४४:
एकूण श्लोक: २
२० फ़ेब्रुवारी
संध्याकाळी ०४.२०
समाधिसंजीवनाचा एक एक कल्लोळ।
नीलवितानीचा एक एक तेजोगोल।
परेंत स्फुरलेला एक एक अमृत बोल।
मुक्तावर्षाव, आसवांचा! ।। ।।१।।
‘सुवर्ण’ संज्ञेचे त्रसरेणू।
ज्ञानसमाधि क्षेत्रीं वोपलेले बीजकणू।
मृत्तिकेंत भावलेले त्रिसुपर्णू।
कूटस्थले ब्रह्मदेहीं ।। ।।२।।