शाबरी मंत्रविद्या:
जनक:
श्रीआदिनाथ-उमेच्या तर्फे श्रीमत्स्येंद्रनाथांना ही विद्या प्राप्त झाली. ती त्यांनी श्रीगोरक्षनाथ-श्रीकानीफनाथ यांच्या तर्फे प्रसारित केली.
ग्रंथाचे वैशिष्ठ्य:
यामध्ये मंत्रांचे अनेक संग्रह आहेत. त्यांची रचना पीठ-खंड-पटल अशा तऱ्हेने असून त्यांचे व्यवस्थित संस्करण श्रीगोरक्षनाथांनी केले. या वाक्यांचे किंव वर्णसमूहांचे सामर्थ्य व प्रभाव फार मोठा आहे.
सार्या ३३ कोटी देवांनी आपले सामर्थ्य या विद्येला अर्पण केले आहे. ही एक महाविद्या आहे. हिचे सामर्थ्य अफाट आहे.
विद्येचा उपासक कसा असतो-
नीतिमान
सद्वर्तनी
सद्गुणी
सद्विचारी
यम-नियमांचे पालन करणारा
इंद्रिय-दमनी
हिचा उपयोग:
साधनेच्या पहिल्या पातळीवर- रोजच्या व्यवहारातील, संसारातील नाना अडचणींचा, संकटांचा, विविध तापांचा नाश करता येतो.
हिचे नाव शाबरी का?
श्रीआदिनाथांनी जंगलात साधना करत असताना, श्री गौरीला भिल्लीणीच्या रूपात पाहिले. त्यांनी तिला कळेल अशा तिच्या भाषेत समाधिचे गूढ सांगितले. ते श्रीमत्स्येंद्राने ऐकले. हे सर्व मंत्र जीव-ब्रह्माच्या सेवेसाठी आहेत.
आजची या विद्येची स्थिती-
आजची विद्या शाबरी नसून बर्भरी आहे. तांत्रिक कापालिक मूळ शाबरी विद्येचा दुरुपयोग करु लागले हे पाहून नाथांनी ती गुप्त करुन टाकली.