उन्मनी वाङमय

नाथपंथीय साधना

नाथपंथीय साधना:

 

विविध पंथातील तत्कालीन अघोरी-विकृत-आत्मघातकी आचार-विचार-रुढी यांना छेद देऊन, सात्विक-वैराग्यप्रधान तत्वे एकत्र केली गेली.

१) सिध्दसंप्रदायातील - गुरुभक्ती, सामाजिक समता, परोपकार, 

२) वैष्णवपंथातील - तप, दान, आर्जव, अहिंसा, सत्यवचन

३) हरफांकडून - सहज संयम

४) बौध्दांकडून - मध्यममार्ग, ज्ञान-चिंतन, 

५) संतांकडून - अंतःशुध्दी

६) महायानांकडून - संपूर्ण जनतेची काळजी

७) वेदांतातून - ॐची साधना, मुद्रारूपाने आत्मा-परमात्मा यांचे मीलन

८) शून्यवादापेक्षा शिव-शक्ती ज्योत

९) शिव हे दैवत  महादेव या उज्ज्वल रुपात

१०) योगमार्गाचे सुसूत्रीकरण केले: शिव-शक्ती सामरस्य यांच्यातील आनंदाची अनुभूति हे प्राप्तव्य मानले.

११) दत्तपंथातील - योगीपंथ

१२) इस्लाम धर्मातील सामाजिक समता व समानता

१३) आद्यश्रीशंकराचार्य व बुध्दाप्रमाणे लोकभाषा शिकून समाजात िरून आपले कार्य केले.

१४) शाक्तांमधला पंचमकार यांचे अर्थ बदलले.

१५) स्त्रीचे देवता-माता-भगिनी म्हणून पूजन ग्राह्य मानले. 

 

श्रीज्ञानेश्वर म्हणतात -सर्व द्वंद्वांच्या पलीकडील नाथब्रह्माचे चिंतन करणारा हा नाथपंथ आहे. नाथ परमानंदात रमतात आणि जगाचेही भान ठेवतात. 

 

 

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search