नाथपंथीय दीक्षाविधी व आदेश:
शिष्य बनणाया साधकास शृंगीचा नाद माहित असावा लागतो.
सद्गुरुकडून ॐकाराचा उपदेश मिळाला की आदेशाची क्रिया चालू होते.
आदेश म्हणाजे नमस्कार.
उपदेश देव व गुरु यांच्य़ा समक्ष दिला जातो.
कर्णवेध करताना सांगितले जाते की- ज्ञानी हो, धर्माचे पालन कर, गुरुच्या सेवेत रहा.
गुरुच्या मार्गदर्शनाखाली शिष्य योगी होतो.
अखंड इश्वरस्मरण, पवित्र आचरणा, मनोजय, पंचमहाभूतांवर ताबा मिळवल्य़ानंतर तो नाथ होतो.
विशिष्ठ वेशभूषा दिली जाते. ती धारण करून शिष्य गुरुस वंदन करतो.
आपल्या गुरुंची आज्ञा घेतो व ‘अलख निरंजन’ हा घोष करून भिक्षा मागतो.
या पंथाचे ‘अलख’ व ‘आदेश’ हे ब्रीद शब्द आहेत.