प्रधान आचार:
पूर्वपीठिका:
श्रीगोरक्षनाथांच्या काळात वामाचार हा पराकोटीला पोहोचला होता. त्यात स्त्रीचे शरीर "शाक्त पीठ" झाले होते. समाजमनातील विकृती नाहिशी करण्याकरीता शुध्दाचरणाचा-संयमाचा-नीतीचा उपदेश त्यांनी केला. त्यांचे स्वतःचे वर्तन अतिशय उदात्त, पवित्र, नैष्ठिक, विरागी, त्यागी, ब्रह्मचर्यपरायण, योगिक व नैतिक होते.
त्यांनी स्वतः तंत्रशास्तआतील प्रमुख साधनांतील सातही आचार साधनेसाठी स्वॆकारले व कौलज्ञान हा श्रेष्ठ आचारपंथीय आचार केला.
यात ७ प्रधान आचार मानले आहेत:
१) वेदाचार:
वैदिक कर्मप्रधान यज्ञयागादि साधना
२) वैष्णवाचार:
मित भोजन, पवित्र भावाची भक्ती, भन, व्रत, उपास, व ब्रह्मचर्य
३) शैवाचार: यम-नियम-ध्यान, धारणा, समाधि, व शिवशक्ती उपासना
४) दक्षिणाचार:
वैदिक, वैष्णवी, शैवी आचार यात आहेत. पशुभावाच्या व वीरभावाच्या साधना ही आहेत.
५) वामाचार:
यात आत्म्याला वामा म्हणजे शक्ती समजून साधनाकर्म केले जाते.
६) सिध्दांताचार:
हा सर्वश्रेष्ठ आचार आहे. मनाला अधिकाधिक शुध्द करायचे, सर्वाठायी ब्रह्मरूप पहायचे, व मग स्वतःच ब्रह्मानुभूति घ्यायची हा भाव या साधनेत आहे. परमशिव हा श्रेष्ठ भाव यात आहे.
७) कौलाचार:
अत्यंत साम्यदृष्टीथेवायची, चराचरी ब्रह्मरूपाच्याही पुढे जायचे, व निरिच्छ होऊन पाप-पुण्य, सिध्द-सिध्दी, कर्म-अकर्म हा भाव देखील गुरुनिष्ठ होऊन ठेवायचा नाही. हा अति पवित्र भाव आहे. या आचारातच सर्व साधकांची इतिश्री आहे.
खरा कौलज्ञानी हा अद्वैती होतो.