दीक्षेचे प्रकार:
१) साधक - श्रेष्ठ अधिकारी
प्रातिभ ज्ञानाच्या रूपाने उपदेश सद्गुरू करतात.
प्रातिभ ज्ञान ह्रदयामध्ये आपोआप उत्पन्न होते.
या विशुध्द ज्ञानाने हृदयातील संशय संपूर्णपणे नाहीसे होतात.
२) साधक - मध्यम अधिकारी
विशुध्द चेतनांबरोबर शब्दाचा वापर करून शक्तिपाताने उपदेश करतात. या चेतन शब्दामध्ये इतके सामर्थ्य असते की जेव्हा हा शब्द साधकाच्या कानामध्ये प्रवेश करतो तेव्हा तो मर्मस्थानापर्यंत जाऊन भिडतो. ज्यावेळी ही प्रक्रिया घडते त्यावेळी अत्यंत असाधारण, असामान्य, व अलौकिक आंदोलने साधकाच्य़ा हृदयात उपस्थित होतात. साधकाचे हृदय अशा प्रकारे आंदोलित झाले की त्याची स्थिती बदलून जाते. त्याचे बाह्य जगताचे आकर्षणच नाहीसे होते. मन, प्राण व इंद्रिये ही सर्व एकत्रित होऊन अत्यंत प्रचंड व प्रबल वेगाने अंतरात्म्याला भेटून त्याच्याशी समरस होण्यासाठी धावत सुटतात.
३)साधक - कनिष्ठ अधिकारी
सद्गुरू त्यांना अचेतन शब्दाच्या द्वारा उपदेश करतात. त्याबरोबरच ते साधकाला अशा काही विशेष क्रिया करायला सांगतात की त्यामुळे अचेतन शब्द क्रमशः चेतन शब्दात रूपांतरित होत जातो. साधक दीर्घकालपर्यंत विचार व स्मरण करीत राहिला तर त्यामुळे अचेतन शब्द चेतन होऊन शक्ती जागृत होते.