भगवत्भक्तीचा उन्मेष:
ज्यावेळी कुंडलिनीचे जागरण पूर्णपणे घडून येते त्यावेळी जीवाचे जडपण निःशेषपणे नाहीसे होऊन तो शिवत्वाची प्राप्ती करतो.
हे होत असताना अंतर्निहित महाशक्ती जागृत व गतिमान होऊन नित्य जागृत असलेल्या श्रेष्ठ अशा शिव-स्वरूपाशी समरस होण्यासाठी धावू लागते.
यावेळी जीवामधील भक्तियोग संपन्न होऊ लागतो.
अगदी सुरूवातीचे लक्षण म्हणजे श्री महेश्वरांच्या ठिकाणी अत्यंत दृढ भक्ति होते.
हा भक्तिभाव साधकाच्य़ा ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण करतो.
याची सुंदर वर्णने अशी..
१) मालिनी विजयोत्तरतंत्र
२) भक्ति-रसामृत सिंधू (२.१,२,३, ३.८,९,१०,११,१२,१३)
३) श्री ज्ञानेश्वरी ११.२४६ ते २५२)
४) श्री मत भागवत (स्कंध ११, अध्याय-१४, श्लोक २३,२४), (७.७.३५)
५) श्री एकनाथी भागवत (३०८ ते ३१५)(३१७ ते ३३६)
६) श्रीश्रीचैतन्य-चरितावली, खंड १, २७२
७)श्री नारद भक्तिसूत्र - ३८,३९,३,५१