दीक्षा वा अनुग्रह:
जीवात्म्यावरील मल परिपक्व झाल्यावर मलपाकाच्या तारतम्यानुसार कृपा संचारित झाल्याशिवाय राहत नाही. लौकिक जगात ज्याला दीक्षा म्हणतात ते त्याचेच फल आहे. जोपर्यंत दीक्षा होत नाही तोपर्यंत साधकावर कोणत्याही साधनाचा जितका परिणाम व्हायला पाहिजे तितका होत नाही.