भगवत्कृपा:
कोणतेही मार्ग वा साधना मूळ अज्ञानाला स्पर्शहॊ करू शकत नाहीत.
एकमात्र भगवंताच्या कृपाशक्तीच्या द्वारेच या मूळ अज्ञानाची निवृत्ति होऊ शकते.
अन्य कोणत्याही मार्गाने हे घडून येऊ शकत नाही.
भगवत्कृपा ही स्वभावसिध्द आहे व ती निर्हेतुक आहे.
साधकाच्या पात्रतेनुसार तिची कार्यक्षमता प्रतिबिंबित झालेली असते.
कृपाशक्ती जरी नित्य असली तरी जोपर्यंत जीवात्म्यावरील मूळ आवरणरूप मल पक्व होत नाही म्हणजे गळून पडण्याच्या मार्गावर असत नाही तोपर्यंत शक्तिपात होऊन कृपाशक्ती साधकात संचारित होऊ शकत नाही.