आपले मूळ शिवस्वरूप:
शिवस्वरूप आत्मा हा सर्व प्रकाराने संकोच रहित आहे.
- कालाचा संकोच नसल्याने तो नित्य आहे.
- देशाचा संकोच नसल्याने तो विभू (व्यापक)आहे.
- क्रियेचा संकोच नसल्याने तो सर्वकर्ता आहे.
- ज्ञानाचा संकोच नसल्याने तो सर्वज्ञ आहे.
- आनंदाचा संकोच नसल्याने तो नित्यतृप्त आहे.
हेच आत्म्याचे शिवत्व आहे.