चिंतामणी रत्ननिर्मित मंदिर:
मंदिरातील प्रत्येक वस्तू चिंतामणी रत्नांची आहे.
हजारो खांब सूर्यकांत व चंद्रकांत मण्यांनी व तेजस्वी पाषाणांनी केलेले आहेत.
प्रभा एवढी प्रचंड की कोणतीच वस्तू स्पष्ट दिसत नाही.
हे मंदिर मणिद्वीपाच्या मध्यभागी आहे.
मंदिर सहस्र योजने विस्तीर्ण आहे.
ते अंतरिक्षात निराधार आहे.
प्रलय व सृजनाच्या वेळी ते आकुंचन व विकास पावत असते.
मंदिरात कांतिची परमावधी आहे.
दूध, दही, तूप, मध यांच्या नद्या आहेत.
अमृतवाहिनी, द्राक्षरसवाहिनी, जंबुरसवाहिनी, आम्ररसवाहिनी, इक्षुरसवाहिनी अशा हजारो नद्या आहेत.
इच्छेप्रमाणे फळ देणारे वृक्ष आहेत.
विपुल जलाच्या विहिरी आहेत.
रोग-जरा-चिंता-क्रोध-मत्सर-काम यांचा संपूर्ण अभाव आहे.
सर्व प्राणी चिरतरूण, स्त्री-युक्त व सहस्र सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत
ते नित्य देवीची भक्ती करतात.
त्यातील काही सलोकता-समीपता-सरूपता या मुक्ती पावलेले असतात.
मंदिरामध्ये अनेक ठिकाणी धूप लावलेले असतात.
चोहोबाजूंनी काश्मीरकमलांची बाग आहे.
मोगरा व कुंद यांची उपवने आहेत.
कस्तुरीमृग आहेत.
रत्नपायर्यांनी युक्त महावृक्षांचे अरण्य आहे.
गुंजारव व सुगंध यांनी युक्त ते अरण्य आहे.
या मंदिरात सर्व ब्रह्मांडातील देवता जगदीश्वरीची सेवा करीत असतात.
ऐश्वर्य, शृंगार, सर्वज्ञता, तेज, उत्तम गुण, दया व सर्व प्रकारचे आनंद यांचा वास येथे असतो.