अज्ञानामुळे दिसणारे परिणाम:
- ‘देह म्हणजेच मी’, ही भावना (देहबुध्दी) असणे
- देहामध्ये असलेल्या इंद्रियांच्या इच्छापूर्तीकरता धडपड करणे
- देहाशी निगडित नाती गोती यात गुंतून पडणे
- मरणाची सतत भीती वाटणे
- आपण अमर असावे ही खोल सुप्त इच्छा असणे
- आपल्याला आवडणार्या व्यक्तीही अमर व्हाव्यात असे वाटणे
- मनात येणार्या सर्व इच्छा लगेच पूर्ण व्हाव्यात असे वाटणे
- इतरांच्या मनासारखे झाले की त्यांच्याबद्दल असूया, मत्सर, द्वेष वाटणे
- इच्छापूर्ती झाली की सुख आणि झाली नाही की निराशा यात जीवाने अडकून पडणे
- सुख ज्यामुळे मिळते त्या वस्तूला, त्या व्यक्तीला धरून ठेवणे व त्याकडून सतत तसेच सुख मिळावे ही अपेक्षा करणे
- ज्यामुळे निराशा येते त्या वस्तूविषयी व व्यक्तीविषयी द्वेष वाटणे
- ज्या व्यक्ती व वस्तूंना धरून ठेवले आहे त्या चिरंतन नाहीत, त्यांत बदल होतो हे सत्य न पचणे
- आपल्या सत्तेमुळे हवे ते घडून यावे असे कितीही वाटले तरी तसे होत नाही हे नाईलाजाने मान्य करावेच लागणे
- मग ज्याच्या सत्तेमुळे घटना घडून येतात त्या सत्तेला देव मानणे व तिने आपल्या मनासारखे सगळे पुरवावे हा हट्ट करणे
- देवाने ऐकले नाही तर त्याचाही द्वेष करणे
- शेवटी निराशा, गोंधळ, वैताग, घुसमट, सुन्नपणा, एकाकी वाटणे, सुडाची भावना, असूया, संताप, हतबलता या भावना उराशी बाळगून मृत्यूला सामोरे जाणे
- मुळात आपण कोण, हा जन्म कशासाठी, आपण कोठून आलो, आपल्याला कोठे जायचे आहे, परमसत्ता कोणाची आहे, याकडे जीवाचे दुर्लक्ष्य होणे