साधना सूत्रे

आत्मा व देह

सप्टें. १९६०

स्वावलंबन ही सुखाची गंगोत्री आहे; पण स्वावलंबन या शब्दांतील `स्व' शब्दाचा अर्थ काय हे प्रथम निश्चित केले पाहिजे.

स्व म्हणजे मी. `मी' शब्दाने व्यक्त होणारा अर्थ मोठा, विशाल व सर्वसमावेशक आहे. देहेन्द्रियादि सर्व अस्तित्वाचा व अवस्थांचा एकंकार म्हणजे `मी'.

आत्मा व देह यांच्यामध्ये आत्यन्तिक भेद करण्याची वेदान्तशास्त्रात एक प्रथा आहे; तथापि त्या भूमिकेतलें रहस्य एवढेचं की आत्मा स्वतंत्र व स्वयंप्रभू आहे; व देह अ-स्वतंत्र व पर-प्रकाशित. 

आत्मा नसेल तर देह भावाला अर्थ नाही व अस्तित्वही नाही. उलटपक्षी `देह' भाव नसला तरी आत्मतत्त्वाला अस्तित्त्व असूं शकते.

या सिध्दान्ताचे प्रमाण म्हणजे स्वप्न व सुषुप्ति या अवस्थांचे स्वरूप होय. या अवस्थेंत `हा माझा देह' ही भावना नसते. तरीही चैतन्य किंवा आत्मतत्त्व जागृत असतेच; व नंतर जाग आल्यावर

 स्वप्नस्थ व निद्रिस्थ असलेला `तोच मी' असा प्रत्यय येतो.

वसिष्ठ व व्यास, याज्ञवल्क्य व शंकराचार्य, निवृ्त्तीनाथ व ज्ञानेश्वर, सॉक्रेटीस व प्लेटो हे सर्व महान् तत्त्वज्ञ आत्मा व देह यांत केव्हा केव्हा भेद करताना दिसतात.

 त्यावेळी त्यांचा खरा आशय एवढाच असतो की, देहाला `स्वतंत्र' अस्तित्व नाही. तो संपू्र्णत: आत्मगत, आत्मस्थित व आत्मसंयुक्त आहे.

 देह व इंद्रिये यांना आत्मतत्त्वापासून निराळी केल्यावर ती मायामय व बंधन स्वरुप होतात.

``आत्मा म्हणजे अनु्भवांना अर्थवत्ता देणारे केंद्र'' (धवल-गिरी पायथ्याशी, पान-३९) हा आत्म्रतत्त्वाचा अर्थ लक्षात घेतल्यावर देहेन्द्रियासून आत्मा-तत्त्व पूर्णत: निराळे होऊ शकत नाही.

केन्द्राच्या परिघाशी व त्रिज्यांशी जो संबंध तोच आत्मतत्त्वाचा देहाशी व इंद्रियांशी होय.

आत्म-तत्त्वांत एकप्रकारचे अतिशयत्व आहे. कारण, ते तत्त्व प्रत्येक देहवृत्तीत, इंद्रियात, इंद्रिय्रसन्न्रिकर्षात अन्तर्भूत असून शिवाय, त्याचे ठिकाणी अतीत-त्व, अति-शयत्त्वही आहे.

वर्तु्ळाच्या केंद्राचीही अशीच परिस्थिती आहे. ते ही प्रत्येक त्रिज्येत व परिघात संदर्भित असून शिवाय त्यांच्याहून निराळे व स्वतंत्र असते. अर्थात हे केवळ उपमान आहे.

 आत्मा व केंद्र यांत लक्ष्य साम्य आहे. सर्व तो साम्य नाही.

आधुनिक मानस-शास्त्रात ज्याला  ीशश्रष ळिशींसीरींळिि किंवा `स्व'`संकलन' म्हणतात, त्यातला  ीशश्रष  किंवा `स्व' हा आत्मतत्त्वाचाच एक व्यावहारिक पर्याय आहे.

मानसिक `स्व' किंवा `अहम्'  िूलीहश्रिसिळलरश्र ीशश्रष हा एकच नसतो. चंचल मनोवृत्तींबरोबर मानसिक `अहम्' चे रुप बदलत असते. या विविध अहं-भावांना आत्मतत्त्व म्हणता येत नाही.

 मानसिक `अहं' च्या पलीकडे आणि त्यांना आधारभूत असे जे एक स्थायी तत्त्व असते ते आत्मतत्त्व होय. मानसिक अहं-भाव,  िूलीहश्रिसिळलरश्र ीशश्रष, आगमापायी म्हणजे येणारे जाणारे

 असल्यामुळे त्याच्या आधारावर संकलन किंवा  ळिशींसीरींळिि होऊ शकणार नाही. `आत्मन्' शब्दाची निरुरक्तानिष्ठ व्याख्या करतांना,``वस्तु मिळ्रविणारा, ग्रहण करणारा, विषयांचा आस्वाद घेणारा व

 ज्याला संतत भाव आहे तो आत्मा'' अशी लक्षणें निरुक्तकारांनी सांगितली आहेत.

अर्थ मिळविणारा, ग्रहण करणारा व आस्वादक ही लक्षणे देह व इंद्रिये यांची निदर्शक आहेत व संतत भाव किंवा चिर-स्थायित्त्व हे लक्षण आत्मतत्त्वाचे आहे.

 आत्मतत्त्वाची लक्षणे करताना, त्याचे सदेहत्त्व विचारांत घेतले आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

 

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search