ॐ नम:शिवाय।
ऑगस्ट १९६४
शिव, सदा-शिव, शंकर हे दैवत परम मांगल्य, सौभाग्य व सच्चिदानंदत्व दर्शविते. सत्+ चित्+ आनंद यांची ज्योती, परब्रह्माचे तेज दर्शविणारे चिन्ह किंवा प्रतीक, असा शिवलिंग, ज्योतिर्लिंग या शब्दाचा अर्थ आहे.
शिव-शंकराचे निवासस्थान स्मशान आहे त्यांच्यासमोर विनाश-धर्म देहांची अग्निज्वाला धगधगत असते; म्हणून ज्वाला किंवा ज्योती हे शिव-दैवताचे प्रसिद्ध लक्षण आहे.
तंत्र योगात शीर्षमध्यामध्ये असलेली ज्योति ही महेश्वर स्वरूप, शिव स्वरूप आहे. कुंडलिनी ही ‘शिवा’ आहे. तिच्या जागृतीने शीर्ष मध्यांतली महेश्वर तत्त्वाची ज्योति अखंडतेने प्रकाशत राहते. शीर्षमध्यातला आतला भाग शिव पिंडिकेसाररखा आहे. त्यांत ही ज्योति प्रकाशू लागली की जी आकृती निर्माण होते ती पूर्णत: बाण आणि शाळुंकेसाररखी, शिव पिंडिकेसारखी दिसते. शिवलिंगाची ही खरी तांत्रिक उपपत्ति आहे.
‘ज्योति’ शब्दाचा ‘सूर्य’ असाही एक अर्थ आहे. बारा ज्योतिर्लिंगे ही बारा महिन्यांच्या बारा आदित्यांची वाचक आहेत. त्याचप्रमाणे बारा राशी ही ज्योतिर्लिंगेच आहेत असा उल्लेख तंत्र-ग्रंथात आढ्रळतो.
एक ऋग्वेदीय द्रष्टा म्हणतो-
ध्रुवं ज्योति: निहितं दृश्येकं
प्रनोजविष्ठ पत्रयल्सु अन्त:!
सर्व मानव-मात्र आणि जात-मात्र यांच्या ठिकाणी एक ध्रुव ज्योतीचा अधिवास आहे. प्रत्येक जीवाणु व जीवमान व्यक्ति हे एक साक्षात ज्योतिर्लिंग आहे. पण त्या आंतर-ज्योतीचा प्रकाश अज्ञानाच्या आवरणाने व विक्षेपाने छायान्वित झालेला असतो.
भारतवर्षातल्या बारा ज्योतिर्लिंगाच्या क्षेत्र स्थानांत बारा आदित्यांची आत्मविश्वे प्राविष्ट झाली आहेत.
गूढ विद्येत सूर्यबिंब हे आत्मतत्वाचे प्रकट प्रतीक आहे. ‘सूर्य आत्माजगत: तस्युषदा’ सूर्य हा स्थिर आणि चर विश्वाचा आत्मा आहे; पण सूर्याचे भौतिक तेज म्हणजे आत्मतत्त्व नव्हे, किंबहुना आत्मतत्त्वाला झाकणारा, आवरण घालणारा तो सूर्यप्रकाश म्हणजे तत्त्वदृष्ट्या पहाता, एक प्रलयात्मक अंध:कारच होय.
हिरण्यमयेन पात्रेण सत्यसप्रिहितं मुखम् ।
तत त्वं पूषन् अपावृणु सत्यधर्माय दृष्ट्ये ।।
ईशावास्यातला हा मंत्र, आत्म-विद्येतील एक रहस्य रत्न आहे.
खरोखर सूर्याच्या तेजाचे उगमस्थान आत्म-तत्त्व हेच आहे. ‘न तम सूर्यो, भीति न चन्द्रमा। यस्य आसा सर्वमिदं विमाती।।’
बारा ज्योतिर्लिंगे ही, ध्रुव ज्योति, आत्म-ज्योति या मूल-ज्योतिची प्रकट व स्वयंपूर्ण प्रतीके आहेत. त्यांच्या दर्शनाने विश्वाभास मावळेल व आत्म-तत्त्वाचा चंडांशु उठावेल.