भारतीय सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी:
तत्कालीन विविध मासिकांचे संपादक, महर्षींकडून सन्मानपूर्वक साधनासूत्रे लिहून घेत असत. ते परदेशांमध्ये गेले तरी त्यात खंड पडला नव्हता.
चैत्रापासून ते फाल्गून महिन्यापर्यंत जे महत्त्वाचे सण भारतभर साजरे केले जातात,
त्यांच्य़ा मागची आध्यात्मिक पार्श्वभूमी वाचल्यानंतर, त्यातली वैदिक परंपरा, विचार-आचारांतील सखोलता लक्षात येते. रूढी म्हणून काहीही ‘साजरे’ करण्यापेक्षा समजून घेऊन श्रध्देने सण साजरे करण्यातली गंमतच वेगळी.