१९८४-८५ मध्ये जुने पेटारे शोधतांना रोहिणी, माऊली, ज्ञानदूत, प्रसाद या नावाची खूप
जुनी नियतकालिके सापडली. १९४६ पासून ते १९६९ पर्यंत प्रसिध्द झालेली ही साधनासूत्रे
गोळा करुन मी फाईल केली आणि त्यावेळी संस्थेमध्ये योगदान देणा-या काही विद्यार्थी
कार्यकर्त्यांना विनंती करुन पाच-सहा वह्यांमध्ये ती लिहवून घेतली. अधूनमधून ती मी
वाचत असे आणि विलक्षण आनंदामध्ये रमून जात असे.
आपल्याकडे एक मोठा ठेवा आहे आणि ही श्रीमंती न मोजता येणारी आहे असं मला
त्यावेळी वाटत असे.
भारतीय सण, देवदेवता या विषयांवरील १९ साधनासूत्रे मिळाली. विविध थोर व्यक्तींविषयी,
त्यांनी लिहिलेल्या अनुभवांविषयीची ८ सूत्रे मिळाली. संतांवर त्यांनी लिहिलेली १४ साधनासूत्रे
मिळाली. भारतीय तत्वज्ञान आणि साधनेचे विविध मार्ग यावर त्यांनी ५३ साधनासूत्रे
लिहिली आहेत.